ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर तिने सात महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न उरकलं. दोघंही सध्या एकत्र राहत आहेत. मात्र राखीने आदिलच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे अभिनेत्री राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे.

राखीच्या अटकेपूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती आदिलच्या कुटुंबियांवर आरोप करताना दिसत आहे. याआधी आदिलने राखीबरोबर लग्न केलं असल्याचं मान्य केलं नव्हतं. पण आता राखीशी लग्नगाठ बांधली असल्याच्या खुलासा आदिलने केला.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Amir Khan Video Supporting Congress Asking for 15 lakhs
“जर कुणाच्या खात्यात १५ लाख नसतील तर..”, म्हणत आमिर खान काँग्रेसच्या प्रचाराला उतरला? Video पाहिलात का?
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

आणखी वाचा – Breaking: अभिनेत्री राखी सावंतला अटक!

राखीचे सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप

राखी म्हणाली, “लग्नाला सात महिने झाले आहेत. आदिल व माझं आयुष्य सुखी आहे. पण काही लोक आहेत जे मला व आदिलला वेगळं करु इच्छित आहेत. मला मीडियासमोर सगळ्याच गोष्टी सांगता येत नाहीत. मला मीडिया ट्रायल नको आहे. आदिल माझ्यावर खूप प्रेम करतो. माझं आदिलवर खूप प्रेम आहे.”

“पण आदिलला त्याची काही लोकं म्हैसूर येथे बोलावत आहेत. त्याला विविध गोष्टी सांगून म्हैसूरला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पैसे दाखवून त्याला बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण माझा आदिल पैश्यांकडे दुर्लक्ष करणारा आहे. माझं कसं नशीब आहे? लग्न करुनही मला सुख नाही. माझा नवरा मुस्लिम आहे तर मी बुरखा परिधान करणारच. मी नमाजही पाडणार.” राखीच्या या वक्तव्यानंतर तिचं वैवाहिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.