scorecardresearch

Video : “लग्न झाल्यानंतर मुलींपासून…” घटस्फोटाची धमकी दिल्यानंतर राखी सावंतचे पतीवर गंभीर आरोप

“आदिल म्हैसूरवरुन एक रुपया घेऊन मुंबईत आला होता, मी त्याला…” राखी सावंतचा संताप

rakhi sawant adil khan
राखी सावंत

मॉडेल व अभिनेत्री राखी सावंतच्या आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यानंतर आता राखीने तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत नवा ड्रामा सुरू झाला आहे. राखीने आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचे उघड केले होते. त्यानंतर आता राखीने प्रसारमाध्यमांशी बोलताना आदिलने दिलेल्या धमकीबद्दल भाष्य केले आहे. त्याबरोबरच आदिलचे ज्या मुलीबरोबर अफेअर आहे तिनेही तिला धमकी दिली आहे.

यावेळी राखी म्हणाली, “आधी पहिल्या नवऱ्याचा ड्रामा घेऊन आली. आता दुसऱ्या नवऱ्याचा ड्रामा करते. माझ्या आईचा मृत्यू झाला, हे पण खोटं आहे का? रात्री जेव्हा तो माझ्याबरोबर झोपला होता, तेव्हा तो म्हणाला की “तू माझं त्या मुलीबरोबरच्या काहीही गोष्टी व्हायरल केल्यास तर मी तुला घटस्फोट देईन. मी ते व्हायरल करणार नाही. मी फक्त प्रसारमाध्यमांसमोर येऊन तिला धमकी दिली आहे.”
आणखी वाचा : Video : “पुरुषांची वृत्ती तशीच असते, पण एक स्त्री…” वैवाहिक आयुष्यात वादळ आल्यानंतर राखी सावंत संतापली

“पण ती मुलगी मला फोन करुन म्हणते की, ‘मी मीडियाला अजिबात घाबरत नाही आणि तुला तर अजिबातच घाबरत नाही. आदिल तुला १०० टक्के घटस्फोट देणारच. तिला याबद्दल अति आत्मविश्वास आहे. तो मला फार आवडतो. मी त्याच्यावर १०० टक्के प्रेम करतो. त्यावर मी तिला सुनावले आणि म्हणाली, ‘जो त्याच्या पत्नीबरोबर प्रामाणिक नाही, तो तुझ्याबरोबर कसा असेल. त्यावर तिने म्हटलं की तुला त्याला नीट ठेवता आलं नाही. मला ठेवता आलं नाही.’

आदिल म्हैसूरवरुन एक रुपया घेऊन मुंबईत आला होता. त्याला मी घर, गाडी, पैसे सर्व दिलं. दुबईत घर घेतलं. बॉलिवूडमध्ये त्याचे नाव, घराघरात आदिल खानला प्रसिद्धी ही फक्त माझ्यामुळे मिळाली आहे. आदिलने मला मी तुला घटस्फोट देईन अशी धमकी दिली आहे. गेल्या सात ते आठ महिन्याच्या आमच्या वैवाहिक आयुष्यात मी तीन मुलींना याच्यापासून वेगळं केलं आहे”, असे राखीने यावेळी म्हटले.

आणखी वाचा : Video : “तू दिसतेस फार सुंदर साडीवर…” सुमितने वनिता खरातसाठी घेतला खास उखाणा

दरम्यान राखी सावंत आणि आदिल खानने मे महिन्यात कोर्ट मॅरेज केलं होतं. परंतु, लग्नाच्या सात महिन्यांनी राखीने तिच्या लग्नाचा खुलासा केला होता. तेव्हाही बऱ्याच दिवसांच्या ड्रामानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं. पण आता आदिलच्या अफेअरमुळे राखीच्या संसारात वादळ आल्याचं म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 11:07 IST
ताज्या बातम्या