आदिल खान दुर्रानीने राखी सावंतला मारहाण केली आहे. खुद्द राखीनेच तिच्यावर आरोप करत त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दिली आहे. आज सकाळीही तो राखीला मारण्यासाठी घरी पोहोचला होता, पण आपण पोलिसांना सांगितल्यामुळे त्याला अटक झाली, असं राखीने म्हटलं होतं. त्यानंतर आता राखीचा भाऊ राकेशने या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
“जो इतक्या मुलींबरोबर…” आदिल खानपासून घटस्फोट घेण्याबद्दल स्पष्टच बोलली राखी सावंत
राखीचा भाऊ राकेश म्हणाला, “आदिल खानने राखीला बेदम मारहाण केली होती. ज्यादिवशी आईचं निधन झालं, त्याच दिवशी आम्ही बोलत असताना त्याने राखीला मारलं होतं. आदिलचं हे कृत्य पाहून आम्ही कुटुंबीय संतापलो होतो. आम्ही राखीला कूपर हॉस्पिटलला नेलं, तिच्यावर तिथे उपचार करण्यात आले. तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण उमटले होते. तिच्या शरीरावर मारहाणीमुळे काळे डाग पडले होते, त्याने आमच्यासमोर राखीवर हात उचलला होता. आम्ही त्याच्याशी बोलल्यावर तो खूप उद्धटपणे आमच्याशी बोलला होता. तसेच हे माझं आणि राखीचं वैयक्तिक प्रकरण असल्याचं तो आम्हाला म्हणाला होता. त्याने अमानुषपणे राखीला मारहाण केली. त्याच्यावर मारहाण व चोरी, फसवणूकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
राखी सावंतच्या तक्रारीनंतर आदिल खानला अटक; अभिनेत्री रडत म्हणाली, “तो मला…”
“आदिलने राखीचे पैसे घेतले आहेत, ते पैसे त्याने दुबईत वापरले. राखीच्या पैशांनी त्याने प्रॉपर्टी घेतली. त्याने मला दुबईहून फोन केला होता. तेव्हा मी त्याला म्हटलं होतं की तुला काही घ्यायचं असेल तर ते तुझ्या पैशांनी घे, राखीच्या पैशांनी का घेत आहेस, तू तिचा पती असलास तरी तुला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर स्वतःच्या पैशांनी घे, असं मी त्याला म्हणालो होतो,” असं राखीच्या भावाने सांगितलं.
आदिल सध्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये असून घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस त्याची चौकशी करत आहेत. राखीच्या तक्रारीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती.