Premium

“मी मेल्यानंतर…” पापाराझींना पाहताच ढसाढसा रडली राखी सावंत, नेमकं काय घडलं?

राखी सावंतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

rakhi sawant cry
राखी सावंत

अभिनेत्री राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. राखी सावंतच्या अडचणी संपता संपत नसल्याचे दिसत आहे. एकीकडे राखी सावंतची आई रुग्णालयात कॅन्सरशी झुंज देत आहे. तर दुसरीकडे शर्लिन चोप्राच्या तक्रारीमुळे तिच्यावर अटकेची टांगती तलवार पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीशी लग्न केल्यानंतर बराच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावर आता राखी सावंत ही पापाराझीवर संतापल्याचे पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सोशल मीडियावर राखी सावंतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राखी सावंत ही पापाराझींवर राग व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडीओत राखी सावंत हे एका ठिकाणी उभी असल्याचे दिसत आहे. त्यावेळी पापाराझींना पाहताच राखी म्हणाली, “मला एक सांगा ज्या दिवशी माझा मृत्यू होईल, त्या दिवशीही तुम्ही माझ्या कबरीपर्यंतही याल का? माझी सध्या जी अवस्था आहे, त्याबद्दल मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही. पुढे काय होईल काहीही माहिती नाही, असे म्हणत राखी रडायला लागली.”
आणखी वाचा : “अगदी राखी सावंतलाही लग्नासाठी…” तस्लिमा नसरीन यांचे इस्लाम आणि धर्मांतराबद्दल मोठं वक्तव्य

यावेळी पापाराझींनी राखीचे सांत्वन केले. तिला शांत होण्यास सांगितले. यावेळी राखीचे सांत्वन करताना एक पापाराझी म्हणाला, तुम्ही हजारो वर्ष जगावं अशी आमची इच्छा आहे. राखीची झालेली अवस्था पाहून तिचे चाहतेही दु:खी झाले आहेत. राखीच्या या व्हिडीओवर गायक राहुल वैद्यनेही कमेंट केली आहे. ‘अरे हे राखी… काय झालं?’ अशी कमेंट त्याने केली आहे.

आणखी वाचा : गळ्यात वरमाला, हातात मॅरेज सर्टिफिकेट; नवविवाहित राखी सावंतच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो पाहिलेत का? 

दरम्यान राखी सावंतच्या लव्ह लाइफची नेहमीच चर्चा होताना दिसते. राखीनं २०१९ मध्ये एनआरआय असणाऱ्या रितेशबरोबर लग्न केलं होतं. ते दोघे बिग बॉसच्या रिअ‍ॅलिटी शो मध्येही दिसले होते. पण २०२२ मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याचवर्षी राखी आणि आदिलने डेट करण्यास सुरुवात केली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rakhi sawant cries and get angry at paparazzi said when i cry watch video nrp

Next Story
Video : फटाके फोडले, ढोल-ताशाच्या तालावर बेभान होऊन नाचले अन्…; शाहरुख खानचा ‘पठाण’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांबाहेर तुफान गर्दी