सहा महिन्यांपूर्वी आपल्या लग्नाबद्दल खुलासा करणाऱ्या ड्रामा क्वीन राखी सावंतच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली आहे. राखीने वर्षभरापूर्वी आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं होतं. पण तिच्या आईच्या निधनानंतर तिचा पतीबरोबर वाद सुरू झाला. त्याने मारहाण केल्याचे व फसवणुकीचे आरोप करत पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आदिल खान दुर्रानीची तुरुंगात रवानगी केली होती.

हेही वाचा – Video: रिक्षानं प्रवास करणारी श्रद्धा कपूर म्हणते ‘ऑटोसारखं काहीच नाही’, नेटकरी म्हणाले…

आदिल तुरुंगात असतानाच राखीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता त्या दोघांचाही घटस्फोट होणार आहे, याबाबत राखीने माहिती दिली. सोमवारी राखी लाल रंगाच्या लेहेंग्यात नाचताना दिसली आणि तिने आदिल खानशी घटस्फोट होत असल्याचं सांगितलं. घटस्फोटानंतर लोक दुःखी होतात पण आपल्याला घटस्फोटाचा आनंद झाल्याचं राखी म्हणाली.

हेही वाचा –

हेही वाचा – सई ताम्हणकर बॉयफ्रेंड अनिश जोगबरोबर फिरतेय स्पेन; ‘त्या’ एका फोटोने उलगडलं गुपित

“होय, मी माझा घटस्फोट होत आहे आणि ही माझी ब्रेकअप पार्टी आहे. लोक दु:खी असतात, पण मी आनंदी आहे,” असं राखी सावंत म्हणाली. या व्हिडीओमध्ये राखी डोक्यावर ओढणी घेऊन नाचताना दिसत आहे. आदिल खानपासून घटस्फोट घेणार असल्याने खूप खूश असल्याचं राखीने सांगितलं.

दरम्यान, राखी सावंतने मे २०२२ मध्ये इस्लाम धर्म स्वीकारून आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं होतं. तिने तिचं नाव बदलून फातिमा ठेवलं होतं. राखी सावंतने लग्नाची बातमी सहा महिने लपवून ठेवली होती. पण पतीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने लग्नाबद्दल खुलासा केला. त्यानंतर अवघ्या महिनाभरातच तिने आदिलविरोधात तक्रार दिली होती. राखीच्या तक्रारीव्यतिरिक्त म्हैसूरमधील एका इराणी तरुणीनेही आदिलवर बलात्काराचा आरोप केला होता.