Rakhi Sawant Divorce : गेल्या बऱ्याच दिवसांपासून राखी सावंत व तिचा पती आदिल खान दुर्रानी यांच्यामधील वाद चर्चेचा विषय ठरत होता. आदिल विरोधात राखीने अनेक गंभीर आरोप केले. आदिलसह त्याच्या कुटुंबियांबाबतही राखीने भाष्य केलं होतं. वाद होऊनही आदिलला घटस्फोट देणार नसल्याचं राखी सातत्याने म्हणत होती. पण आता तिने युटर्न घेतला आहे. राखी लवकरच आदिलपासून विभक्त होणार आहे. याबाबत तिने स्वतः भाष्य केलं आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
‘इटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राखीने म्हटलं की, “माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की, येत्या काळामध्ये मी लवकरच घटस्फोट घेणार आहे. आता मी स्वतंत्र्यपणे जगू इच्छित आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला पुढे जायचं आहे. आता आदिल खान दुर्रानीबरोबर कोणत्याही मुलीला लग्न करायचं असेल तर ती करू शकते”.
“त्याच्याशी कोणीही लग्न केलं तरी मला फरक पडत नाही. मला आता या सगळ्यामधून बाहेर पडायचं आहे”. राखीने लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं आता स्पष्टपणे सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राखीचे नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इतकंच नव्हे तर तिने आदिलच्या राहत्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांशीही संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.
आदिल तिला मारहाण करायचा तसेच त्याचं अफेअरही होतं असे अनेक आरोप राखीने केले. राखी व आदिलने मे २०२२ मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. लग्नाच्या सात महिन्यांनंतर राखीने याबाबत खुलासा केला होता. शिवाय अनेक दिवसांच्या ड्रामानंतर राखीबरोबर लग्न केल्याचं आदिलने मान्य केलं होतं. आता राखी व आदिलचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे.