scorecardresearch

“तू ज्या वेदनेत…” आदिल खानची कोठडीत रवानगी होताच राखी सावंतच्या पहिल्या पतीचं मोठं वक्तव्य

राखी सावंतचा पहिला पती रितेश राज याने राखीच्या आईचं निधन व राखीची सध्याची अवस्था यावर प्रतिक्रिया दिली आहे.

rakhi sawant husband ritesh raj
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री राखी सावंत व तिचा पती आदिल खान यांच्यात वाद झाला आहे. आधी लग्न स्वीकारण्यास नकार देणाऱ्या आदिल खानने नंतर मारहाण केल्याचे आरोप राखीने केले, तसेच त्याचे अफेअर असल्याचंही तिने सांगितलं. त्यानंतर मारायला घरी आलेल्या आदिलबद्दल तिने पोलिसांत तक्रार दिली आणि आदिल खानला अटक झाली. त्यानंतर त्या कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशातच राखी सावंतचा पहिला पती रितेश राज याने सध्या राखीच्या आयुष्यात सुरू असलेल्या सर्व गोंधळावर प्रतिक्रिया दिली आहे.

गर्दीत बॅगेचा उल्लेख होताच बेशुद्ध राखी सावंतने उघडले डोळे, Video व्हायरल

राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती रितेश इंस्टाग्रामवर लाइव्ह आला होता. यावेळी त्याने राखी व आदिलच्या नात्याबद्दल भाष्य केलं. “राखी खूप छान मुलगी आहे. राखी खरं बोलत आहे. राखी आज आदिलबद्दल जे काही सर्वांसमोर सांगत आहे, ते तिनं मला तीन महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. राखी मी तुझ्यासोबत आहे आणि सदैव असेन. आज तू ज्या वेदनेत आहेस, त्या वेदना मलाही एकेकाळी झाल्या होत्या. माझ्या आई-वडिलांनंतर माझ्यावर जर कोणी सर्वात जास्त प्रेम केले असेल तर ती फक्त राखीच होती”, असं रितेश राज म्हणाला.

रवीना टंडनने अक्षय कुमारशी मोडलेल्या साखरपुड्याबद्दल तब्बल २२ वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “त्याच्या आयुष्यातून…”

रितेशने पुढे सांगितले की, “ज्या दिवशी राखीच्या आईचं निधन झालं, त्याच दिवशी ती माझ्या स्वप्नात आली होती. त्यांनी मला एका वेळी एक गोष्ट सांगितली. त्यांनी मला नेहमी राखीला सपोर्ट करायला सांगितलं. म्हणूनच राखी मी सदैव तुझ्यासोबत आहे. राखी मी तुझ्याबरोबर काहीही वाईट केलं नव्हतं. तुला त्रास दिला नव्हता. मी तुझ्या आईवर दोन वर्षे उपचार केले. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. जिथे तुला माझी गरज पडेल, तिथे मी असेन.” रितेशने यावेळी राखीच्या आईमुळे आपण तिला पाठिंबा देत असल्याचं म्हटलं.

राखीच्या जीवाला धोका आहे. राखीला काही झालं तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल, राखी, काळजी घे. मला माहित आहे राखी तुझ्याबरोबर वाईट झालंय, असं रितेश यावेळी म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 08:14 IST