Rakhi Sawant Govinda Komal Rani Swarnkar Controversy: अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक नात्यातील वाद पुन्हा चर्चेत आले आहेत. गोविंदाने बायकोला सोडून कोमल राणी स्वर्णकारसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरून सुनीतासह अनेकांनी टीका केल्यानंतर कोमल राणीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत सडेतोड उत्तर दिले. यामुळे राखी सावंतने कोमल राणी स्वर्णकारला कठोर शब्दांत उत्तर दिले असून तिला इशारा दिला आहे.

राखी सावंतने पापाराझीला फोटोसाठी पोज दिल्यानंतर तिने कोमल राणी स्वर्णकारवर संताप व्यक्त केला. ती म्हणाली, “गोविंदाजी तुम्हाला गांभीर्याने सांगते, तुमच्यावर पूर्ण देश नाराज आहे. ज्या महिलेने तुमच्याबरोबर लग्न केले आणि ४० वर्षे तुमच्याबरोबर संसार केला, तुमच्या दोन मुलांना जन्माला घातले आणि तुम्ही तिला सोडून देताय.”

माझ्या नादी लागू नको – राखी सावंत

पुढे राखी म्हणाली, “कोण आहे ही कोमल आणि रुपा? हे काय सुरू आहे? आणि ही माझ्याबाबत काहीपण बोलतीये आणि इतर काही सेलिब्रिटींबाबत बकवास करत आहे. चीची भैया तुमच्यामुळे तिला हे पंख फुटले आहेत आणि म्हणून ती एवढं बोलत आहे. तसेच कोमल तू लक्षात घे, माझ्या नादी लागू नको, मी सुनीता नाहीये, तुला उद्ध्वस्त करेल लक्षात ठेव.”

कोमल राणी स्वर्णकारला इशारा देत राखी सावंत म्हणाली, “जो पण कोणता सिनेमा करत आहेस, तो इज्जतमध्ये राहून कर. राक्षसीण दुसऱ्यांचे पती चोरत आहेस, पतीचोर. दुसऱ्याच्या संसारात आग लावत आहेस. गोविंदाच्या पैशांचा वापर करून सिनेमात काम करण्याचा विचार करतीये. गोविंदाच्या नावाचे सिंदूर लावत आहेस, पण गोविंदा कधी तिचे (सुनीताचे) झाले नाहीत तर तुझे कधी होणार?”

दरम्यान, कोमल राणी स्वर्णकारने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत तिच्यावर टीका करणाऱ्या सेलिब्रिटींवर राग व्यक्त केला होता. तिने लिहिलेले, “आम्ही आमचा सिनेमा रुपाची घोषणा केली असून कोणत्याही रोमँटिक अफेअरची घोषणा केलेली नाही, त्यामुळे आम्ही एकत्र प्रमोशनसाठी नाहीतर आमचं वैयक्तिक नातं दाखवण्यासाठी आलोय हे ठरवणारे तुम्ही कोण? आम्ही एकत्र काम करतोय, त्यामुळे यापुढेही आम्ही एकत्र दिसून येऊ, या गोष्टीचा जर कोणाला त्रास होत असेल तर त्याने आमच्यावर खुशाल जळावे.”