scorecardresearch

दुसऱ्याच मुलीबरोबर अफेअर ते मारहाणीचे आरोप, राखी सावंतच्या नवऱ्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आदिल खान व राखी सावंत यांच्यामधील वाद वाढला, आदिलला अटक झाल्यानंतर नवी माहिती समोर

Adil Khan Durrani Arrested Rakhi Sawant
आदिल खान व राखी सावंत यांच्यामधील वाद वाढला, आदिलला अटक झाल्यानंतर नवी माहिती समोर

राखी सावंत व तिचा पती आदिल खान दुर्रानीमधील वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. राखीने पती आदिल खान विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ७ फेब्रुवारी (मंगळवारी) आदिलला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आदिलला अंधेरी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. आता या दोघांच्या वादाबाबत एक नवी माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – Video : राखी सावंतच्या पतीला पोलिसांनी अंधेरी कोर्टामध्ये केलं हजर, आदिल खानचा मास्कने तोंड लपवण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

राखी व आदिल यांच्यामधील वाद आणखीनच चिघळला आहे. ‘न्यूज १८ हिंदी’च्या वृत्तानुसार आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राखीचा घरातील वाद कोर्टापर्यंत येऊन पोहोचला आहे. राखीने आदिलवर केलेल्या आरोपांबाबत तिच्या भावानेही भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – Video : …अन् बोलता बोलता जमिनीवर कोसळली राखी सावंत, पती आदिल खानच्या अटकेनंतर अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

राखीला मारहाण केल्याचे फोटो भावाने प्रसारमाध्यमांसमोर दाखवले. शिवाय त्याचं पहिलं लग्न झालं असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. आज (८ फेब्रुवारी) सकाळी आदिलला अंधेरी कोर्टामध्ये घेऊन जाण्यात आलं. यावेळी त्याला ओढत कोर्टाकडे घेऊन जात असतानाचं चित्र पाहायला मिळालं.

आणखी वाचा – वीणा जगतापला अजूनही विसरु शकला नाही शिव ठाकरे, ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “तिला…”

कोर्टामध्ये जाताना आदिलने आपला चेहरा लपवला होता. त्याने मास्कने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. आदिलमुळे माझं आयुष्य उद्धवस्त झालं असल्याचं राखी सातत्याने म्हणत आहे. शिवाय आईच्या निधनाला जबाबदार आदिल असल्याचं राखीचं म्हणणं आहे. आता या दोघांमधील वाद आणखीन किती वाढणार? हे येत्या काही दिवसांमध्येच उघड होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 17:35 IST

संबंधित बातम्या