राखी सावंतकडून आदिल खानच्या गर्लफ्रेंडचा गौप्यस्फोट, पहिला फोटोही आला समोर | Rakhi sawant Husband Adil Khan Durrani Girlfriend Tanu Chandel first photo on social media nrp 97 | Loksatta

राखी सावंतकडून आदिल खानच्या गर्लफ्रेंडचा गौप्यस्फोट, पहिला फोटोही आला समोर

ती एक बिझनेसवुमन असल्याचे बोललं जात आहे.

Adil Girlfriend Tanu photo

मॉडेल व अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. अभिनेत्री राखी सावंतच्या दुसऱ्या वैवाहिक जीवनात वादळ आलं आहे. नुकतंच राखीने तिचा पती आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता आदिलच्या गर्लफ्रेंडचा फोटो समोर आला आहे.

नुकताच राखी सावंत तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत नवा ड्रामा सुरु केला आहे. राखीने काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांसमोर येत पती आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता राखीने त्या मुलीचे नावही उघड केले आहे. राखीने दिलेल्या माहितीनुसार आदिलच्या गर्लफ्रेंडचे नाव तनु असे आहे.
आणखी वाचा : Video: आदिल खानने घर सोडल्यानंतर राखी सावंत संतापली; त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव कॅमेऱ्यासमोर केलं जाहीर, म्हणाली…

“आदिलच्या गर्लफ्रेंडचं नाव तनू आहे. तनू मला तुझी लाज वाटते. आदिल आता त्या मुलीबरोबर राहत आहे. ‘तुला वाटत असले की मी परत यावं, तर माफी माग, मी सर्व सोडून येऊन जाईन’, असं आदिल म्हणाला होता. पण तो परत आला नाही. दुसऱ्याच्या पतीला चोरून त्याच्याबरोबर राहणाऱ्या त्या मुलीला लाज वाटायला पाहिजे. माझाच पती खोटारडा आहे, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही,” असं राखी नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाली.

यानंतर आता आदिल खानचे आणि तनुचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोत आदिल हा एका मुलीबरोबर पाहायला मिळत आहे. ही मुलगी तनु असल्याचे बोललं जात आहे. तनु ही स्वत: एक बिझनेसवुमन असल्याचे बोललं जात आहे. ती ३७ वर्षांची आहे.

आणखी वाचा : Video : “पुरुषांची वृत्ती तशीच असते, पण एक स्त्री…” वैवाहिक आयुष्यात वादळ आल्यानंतर राखी सावंत संतापली

तनु आणि आदिल यांचे अफेअर आहे की नाही? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण राखीने तिचे नाव घेतल्यानंतर ती प्रसिद्धीझोतात आली आहे. दरम्यान राखी सावंत आणि आदिल खानने मे महिन्यात कोर्ट मॅरेज केलं होतं. परंतु, लग्नाच्या सात महिन्यांनी राखीने तिच्या लग्नाचा खुलासा केला होता. तेव्हाही बऱ्याच दिवसांच्या ड्रामानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं. आदिलच्या अफेअरमुळे संसारात वादळ आल्याचं राखीने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 18:24 IST
Next Story
सिद्धार्थ-कियाराच्या शाही विवाह सोहळ्याचा थाटच भारी; सूर्यगढ पॅलेसमधील खोलीचं एका दिवसाचं भाडं तब्बल…