scorecardresearch

१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर आदिल खानच्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “राखी सावंतने…”

आदिल खानला अटक झाल्यानंतर त्याच्या वकिलांनी दिली प्रतिक्रिया

rakhi sawant husband adil khan lawyer reaction
आदिल खानच्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री राखी सावंतचा पती आदिल खान पोलिसांच्या ताब्यात आहे. राखीने आदिलविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला ओशिवारा पोलिसांनी अटक केली होती. आज आदिलला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी आदिल खानला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आदिलला अटक झाल्यानंतर त्याच्या वकिलांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

आदिल खानच्या वकिलांनी नवभारत टाइम्सशी बोलताना त्याची बाजू मांडली. ते म्हणाले “राखीने आदिलवर पैसे चोरल्याचा, घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. पण आदिलने पोलिसांना सगळा हिशोब दिला आहे. याउलट राखीनेच पैसे खर्च केले आहेत. आदिल राखीच्या घरी त्याचे कपडे घ्यायला गेला होता, तेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली. राखीने अनेकदा आदिलला मारहाण केली आहे. तिने आदिलवर मारहाण व फसवणूक केल्याचे लावलेले आरोप खोटे आहेत. पूर्ण प्लॅनिंग करुन राखीने आदिलला यात फसवलं आहे”.

हेही वाचा>> Video: भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र अन् हातात चुडा; लग्नानंतर सिद्धार्थ-कियारा पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, अभिनेत्रीच्या नववधू लूकने वेधलं लक्ष

“आदिल व राखीचं बँकेत जॉइंट अकाऊंट आहे. ज्याचा वापर ते त्यांच्या व्यवसायासाठी करायचे. त्या अकाऊंटवरुन व्यवहार झाल्यास त्याच्या पीन नंबरचा मेसेज आदिल व राखी दोघ्यांचाही मोबाईलवर जातो. त्यामुळे राखीला याबाबत माहीत नव्हतं, हे खोटं आहे. आम्ही पोलिसांकडे बँक अकाऊंटचे डिटेल्स व पुरावे दिले आहेत. आदिल खान निर्दोष आहे”, असंही पुढे ते म्हणाले.

हेही पाहा>> Photos: अटक झालेला राखी सावंतचा पती तिच्यापेक्षा १७ वर्षांनी लहान, जाणून घ्या आदिल खानची एकूण संपत्ती

राखीने आदिलवर फसवणूक व मारहाणीचा गंभीर आरोप केला होता. आदिलवर आयपीसी कलम ४०६, ४२०, ५०६, ५१३ व ५२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राखीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ७ फेब्रुवारीला आदिलला अटक केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 18:14 IST