scorecardresearch

राखी सावंतच्या वकिलाचे आदिल खानवर गंभीर आरोप, म्हणाले “तिचे व्हिडीओ बनवून…”

आदिल खान प्रकरणावर राखी सावंतच्या वकिलाची प्रतिक्रिया

rakhi sawant lawyer alleged adil khan
राखी सावंतच्या वकिलाचे आदिल खानवर गंभीर आरोप. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.राखीने आदिलविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला ओशिवारा पोलिसांनी अटक केली होती. आज आदिलला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. याप्रकरणी आदिल खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आदिलला खान प्रकरणी राखी सावंतची वकील फाल्गुनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, फाल्गुनी यांनी राखी सावंतची बाजू कोर्टात मांडली. यावेळी त्यांनी आदिलवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. “आदिल राखीला मारहाण करायचा. त्याने राखीचे पैसेही चोरले आहेत. याबरोबरच त्याने राखीचे काही व्हिडीओही बनवले होते. या व्हिडीओवरुन तो राखीला ब्लॅकमेल करायचा”, असं राखीच्या वकिलांनी म्हटलं आहे. या गंभीर आरोपांसाठी आदिल खानला सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा>> १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर आदिल खानच्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “राखी सावंतने…”

आदिल खानच्या वकिलांनी कोर्टात त्याची बाजू मांडताना राखीने त्याला मारहाण केल्याचं म्हटलं होतं. यावर उत्तर देताना फाल्गुनी यांनी “जर आदिलला मारहाण केली गेली, तर तो गप्प का राहिला? त्याने राखीविरोधात पोलिसांत तक्रार का दाखल केली नाही?”, असा युक्तिवाद केला होता.

हेही पाहा>> Photos: अटक झालेला राखी सावंतचा पती तिच्यापेक्षा १७ वर्षांनी लहान, जाणून घ्या आदिल खानची एकूण संपत्ती

राखीने आदिलचं अफेअर असल्याचा खुलासा केला होता. आदिलच्या गर्लफ्रेंडचं नावही तिने कॅमेऱ्यासमोर जाहीर केलं होतं. याशिवाय तिने आदिलवर फसवणूक व मारहाणीचा गंभीर आरोप केला होता. आदिलवर आयपीसी कलम ४०६, ४२०, ५०६, ५१३ व ५२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राखीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ७ फेब्रुवारीला आदिलला अटक केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 18:51 IST
ताज्या बातम्या