राखी सावंतचं वैवाहिक आयुष्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राखी तिचा पती आदिल खान दुर्रानीवर सतत गंभीर आरोप करत आहे. दरम्यान तिने ओशिवरा पोलिस ठाण्यात आदिल विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं. बुधवारी (८ फेब्रुवारी) आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. एकीकडे वाद-विवाद सुरू असतानाच राखीचा एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – आदिल खानला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर राखी सावंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “मला आनंद…”
राखी तिच्या चाहत्यांना नेहमीच प्रेमाने भेटते. प्रत्येकाबरोबर सेल्फीही काढते. आताही तिचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. राखी कामानिमित्त घराबाहेर पडली असता एक चाहता तिला भेटतो. हा चाहता मी एचआयव्ही रुग्ण असल्याचं राखीला सांगतो. राखी त्याचं म्हणणं ऐकून घेते.
राखी म्हणते, “तू एचआयव्ही रुग्ण असलास तरी काहीही हरकत नाही. तू इथे जवळ उभा राहा. तू माझा भाऊ आहेस.” राखी यादरम्यान त्या चाहत्याला मिठी मारते. राखीचं आपल्याप्रती असलेलं वागणं पाहून चाहताही खूश होतो. राखीच्या वागण्याचं कौतुक करतो. तसेच राखीच्या विचारांमुळे मी आज खूश झालो असं म्हणतो.
राखीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी राखी हे नाटक करत असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी तिच्या या कृत्याचं कौतुक केलं आहे. स्वतः अडचणीमध्ये असतानाही राखी चाहत्यांबरोबर संवाद साधत आहे. तसेच सगळ्यांपर्यंत आनंद पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.