scorecardresearch

निधनाआधी खूपच वेदनादायी होती राखीच्या आईची अवस्था, अखेरच्या क्षणांचा रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर

राखी सावंतने केला शेअर आईचा रुग्णालयातील अखेरच्या क्षणांचा व्हिडीओ

Rakhi Sawant, Rakhi Sawant mother died, Rakhi Sawant mother Jaya Sawant, Jaya Bheda, Rakhi Sawant husband, Rakhi Sawant news, Rakhi Sawant age, Rakhi Sawant family, Rakhi Sawant marriage, Rakhi Sawant real name, Rakhi Sawant father, Rakhi Sawant family, Rakhi Sawant mother age, राखी सावंत, राखी सावंतच्या आईचं निधन
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री राखी सावंतवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राखी सावंतची आई जया यांचं शनिवारी संध्याकाळी निधन झालं. मागच्या बऱ्याच काळापासून त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमरशी झुंज देत होत्या. मात्र शनिवारी संध्याकाळी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राखी सावंतने स्वतः या वृत्ताची पुष्टी केली आहे. आईच्या अखेरच्या दिवसांमध्ये राखी तिच्याबरोबर होती. पण त्यांच्या निधनानंतर राखीची अवस्था खूपच बिकट झाली आहे. आईच्या निधनानंतर राखी सावंतला मोठा धक्का बसला आहे.

आईच्या निधनानंतर राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्रामवर आईच्या अखेरच्या क्षणांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंतची आई रुग्णालयातील बेडवर हळूहळू श्वास घेताना दिसत आहे. त्यांना श्वास घेणंही कठीण झाल्याचं हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येतं. त्या खूपच वेदनादायी अवस्थेतून जात असल्याचंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर राखी सावंत आईच्या रुममध्ये बसून रडत असल्याचंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. रडत रडत राखी सावंत देवाकडे प्रार्थना करत असलेली दिसत आहे.

आणखी वाचा- Rakhi Sawant Mother Died : अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे निधन

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना राखी सावंतने लिहिलं, “आज माझ्या डोक्यावरील आईचं छत्र कायमचं हरवलं आणि आता माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलं नाही. आय लव्ह यू आई, तुझ्यानंतर आता माझं काहीच राहिलं नाही. आता माझा आवाज कोण ऐकणार आणि कोण मला आता मिठीत घेणार आई. आता मी काय करू आणि कुठे जाऊ आई.” राखीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर कमेंट करताना अनेकांनी तिच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा- आईच्या निधनानंतर राखी सावंतचा आक्रोश, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

दरम्यान राखी सावंतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आईचं पार्थिव रुग्णालयातून बाहेर नेत असताना राखी सावंत ढसाढसा रडताना दिसत आहे. रुग्णालयातील राखीचा व्हिडीओ समोर आला असून त्यात ती जोरजोरात अक्रोश करून रडताना दिसत आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात राखी सावंत आईचं पार्थिव घेऊन बाहेर निघत असताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये राखी सावंत खूपच भावुक झाल्याचं दिसत आहे. ती खूप प्रयत्नांनी स्वतःला सांभाळताना आणि आक्रोश करून रडताना दिसत आहे. रडत रडत ती आपल्या आईला हाक मारत असल्याचंही दिसत आहे. राखी सावंतला अशा अवस्थेत पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच भावुक झालेले दिसत आहेत. एवढंच नाही तर या व्हिडीओवर कमेंट करताना नेटकऱ्यांनीही राखीच्या आईसाठी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 09:57 IST