राखी सावंतची आई जया यांचं शनिवारी संध्याकाळी निधन झालं. आपल्या अनेक दिवसांपासून त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमरशी झुंजत होत्या. मात्र शनिवारी संध्याकाळी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जया या राखी सावंत हिच्या भक्कम आधार होत्या. त्यांच्या निधनाने राखी खूप कोलमडून गेली आहे. आईच्या निधनानंतर राखी सावंतला मोठा धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बिग बॉस मराठी’तून बाहेर पडल्यानंतर राखीने तिच्या आईला ब्रेन ट्युमर झाल्याची माहिती दिली होती. त्यापूर्वी २०१५ मध्ये त्यांचं कॅन्सरचंही ऑपरेशन झालं होतं. तर २०२१ सालीही त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया पार पडली. त्यावेळी सलमान खान आणि सोहेल खान यांनी राखीला मदत केली होती. पण आता जया यांचे निधन झाल्यावर राखीचा भक्कम आधार हरपला आहे.

आणखी वाचा : आईच्या निधनानंतर राखी सावंतचा आक्रोश, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

राखी सावंतच्या आईने आनंद सावंत यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. ते मुंबईत पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. राखी त्यांचं आडनाव लावायची. परंतु वडिलांबरोबर राखीचा एकही फोटो आतापर्यंत समोर आलेला नाही. २०१२ साली हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. तर आता राखीच्या आईने जगाचा निरोप घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राखीला राखीचा राकेश सावंत नावाचा एक भाऊही आहे, तर उषा सावंत नावाची एक बहीणही आहे. मात्र हे भाऊ-बहीण आतापर्यंत कधीही एकत्र दिसलेले नाहीत.

हेही वाचा : वयाच्या ४४ व्या वर्षी राखी सावंत गरोदर? प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली…

२०१९ साली राखी सावंतने एनआरआय असलेल्या रितेशशी लग्न केलं होतं. ते दोघं ‘बिग बॉस १५’ मध्येही एकत्र झळकले. मात्र या कार्यक्रमादरम्यानच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि २०२२ साली ते विभक्त झाले. त्यानंतर राखी आदिल खान दुर्रानीला डेट करू लागली. अनेक महिने त्याच्याशी रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०२२ च्या मे महिन्यात त्यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी लग्न केल्याचं जाहीर केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant mother passed away know about her family rnv
Show comments