scorecardresearch

आदिल खानच्या आईला धमकीचे फोन; राखी सावंत म्हणाली “मुलगा तुरुंगात आहे अन्…”

आदिल खानच्या आईला धमकीचे फोन, पैशांची मागणी, वकिलांचा दावा

rakhi sawant adil khan news (1)
आदिल खानच्या आईला धमकीचे फोन. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री राखी सावंत वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती आदिल खानच्या अफेअरच्या खुलास्यानंतर राखीच्या संसारात वादळ आलं आहे. राखीने आदिलविरोधात तक्रार केल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. आज पुन्हा आदिलला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

कोर्टातून बाहेर येताच राखी व तिच्या वकिलांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली आहे. ‘विरल भय्यानी’ या पापाराझी पेजवरुन राखीचा नवा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “आदिल खानच्या आईला धमकीचे फोन येत आहेत” असं आदिलच्या वकिलांचं म्हणणं आहे. यावर उत्तर देत राखीचे वकील म्हणाले, “आदिलचं वकील असं म्हणाले असतील तर मी सांगू इच्छिते की यामुळे ते केस जिंकू शकणार नाहीत. केस हरत असल्याचं दिसल्यावर तुम्ही खोटं बोलत असाल तर ते चुकिचं आहे”.

हेही वाचा>> ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेचं काय करणार? एमसी स्टॅन म्हणाला “आईसाठी…”

हेही वाचा>> Video: आदिल खानच्या अटकेनंतर गर्लफ्रेंड तनु चंडेल पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, राखी सावंतबाबत विचारताच म्हणाली…

“आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळतोय तर आम्ही धमकी का देऊ? आम्ही कायदेशीर पद्धतीने सगळं करत आहोत. त्यामुळे या बेकायदेशीर पर्यायांचा अवलंब करण्याची आम्हाला गरज नाही”, असंही पुढे राखीचे वकील म्हणाले. आदिलच्या कुटुंबियांना धमकी मिळाल्याबाबत राखीनेही भाष्य केलं आहे. राखी म्हणाली, “आदिलचे आई-वडील माझा फोन उचलत नाहीत. माझ्याशी त्यांना बोलायचं नाही. त्यांचा मुलगा आठ दिवस झाले तुरुंगात आहे. त्याला भेटायलाही ते आले नाहीत”.

हेही वाचा>> ‘पठाण’च्या निर्मात्यांकडून चाहत्यांना मोठं गिफ्ट! चित्रपटाचं तिकिट ११० रुपयांत, कधी आणि कुठे? जाणून घ्या

राखीने आदिल खानचं अफेअर उघड केल्यानंतर कॅमेऱ्यासमोरच त्याच्या गर्लफ्रेंड नाव तनु असल्याचं जाहीर केलं होतं. राखीने आदिलवर फसवणुकीसह मारहाण केल्याचा आरोपही केला आहे.याशिवाय राखीने आदिलची गर्लफ्रेंड गरोदर असल्याचंही म्हटलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 15:55 IST
ताज्या बातम्या