राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राखी सावंत सलमान खानला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राखी सावंत म्हणाली की, ‘सलमान खान एक दिग्गज आहे, त्याच्याबद्दल कोणीही असा वाईट विचार करू नये’.
हेही वाचा- “आलिया आधीच विवाहित” नवाजुद्दीन सिद्दीकीचे गंभीर आरोप; पूर्व पत्नीसह भावावर ठोकला १०० कोटींचा मानहानीचा दावा
सलमान खानच्या विरोधात बोलणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देताना राखी सावंत म्हणाली ‘सलमान खान एक धार्मिक व्यक्ती आहे. गोरगरिबांना नेहमी मदत करतो. तो महापुरुष आहे. सलमान भाईसाठी प्रार्थना करा. तो लोकांसाठी खूप काही करतो. अंबानीपेक्षा तो किती श्रीमंत आहे माहीत आहे का? सलमान भाईच्या शत्रूंचे डोळे फुटू दे. त्यांची स्मृती जाऊदे. मी सलमान भाईसाठी प्रार्थना करते, कोणीही त्यांच्याबद्दल वाईट विचार करू नये, असे राखी म्हणाली.
राखी पुढे म्हणाली ‘जे लोक सलमान भाईच्या विरोधात मुलाखती देत आहेत, त्यांना मला विचारायचे आहे की, त्यांनी तुमचे काय वाकडे केले आहे. हात धुवून तुम्ही माझ्या भावाच्या मागे का पडला आहात? तो खूप धार्मिक आहे, कृपया त्याचे अनुसरण करणे थांबवा. माझा भाऊ खूप श्रीमंत आहे, तरीही तो वन बीएचकेमध्ये राहतो. लोकांसाठी खूप काही करतो. त्यांनी माझ्या आईसाठी इतकं केलं आहे की, त्याचं ऋण फेडता येणार नाही.
हेही वाचा- ‘करण अर्जुन’ चित्रपटासाठी सलमान खान नाही तर ‘या’ अभिनेत्याची झाली होती निवड; राकेश रोशन यांचा खुलासा म्हणाले…
आठवड्याभरापूर्वी सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. तुरुंगातून एबीपी वृत्तवाहिनीला दिलेल्या ताज्या मुलाखतीत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला धमकी दिली होती ‘सलमानने बिश्नोई समाजाची माफी मागावी’, असे लॉरेन्सने म्हटले होते. यासोबतच लॉरेन्सने सलमान खानला स्पष्टपणे धमकी दिली होती. यानंतर सलमानच्या टीमला धमकीचा ईमेलही आला होता.