अभिनेत्री राखी सावंत मागच्या काही दिवसांपासून सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच राखीने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्राणीशी लग्न झाल्याचं जाहीर केलं होतं. पण आता तिने आदिल खानने लग्नानंतर विवाहबाह्य संबंध ठेवल्याचे आणि मारहाण केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. यासंबंधी राखीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर आदिलला अटक करण्यात आली आणि आता कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आदिलच्या आईने संपर्क केल्याचं राखीने सांगितलं आहे.

आदिल खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राखी सावंतने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने आदिलच्या आईने आपल्याशी फोनवरून संपर्क केल्याचं सांगितलं. ती म्हणाली, “आदिलच्या आईने मला फोन केला होता आणि मला विनंती केली होती की मी त्याच्यावर केस करू नये. त्याच्या आईला मी अनेकदा सांगितलं होतं की त्यांचा मुलगा माझ्याशी वाईट वागतोय. पण त्याने आदिलवर काहीच फरक पडला नव्हता.”

Mumbai, accident death, uncle, negligence, Nephew
मुंबई : पुतण्याचा निष्काळजीपणा काकाच्या जीवावर बेतला
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

आणखी वाचा- “चुकीच्या मार्गाने…” राखी सावंतने पती आदिल खानकडून मागितली दीड कोटींची रक्कम

राखी पुढे म्हणाली, “आदिलच्या आईचं म्हणणं आहे की तिचा मुलगा लहान आहे. तो काय करतोय ते त्याला समजत नाहीये. त्यामुळे मी त्याच्यावर केस करू नये. असं त्या म्हणाल्या. हा ३० वर्षांचा आहे याला एखाद्या व्यक्तीवर अत्याचार करायचं कसं हे समजतं तर मग तो लहान कसा? त्याच्या आईच्या सांगण्यावर मी त्याला नेहमीच माफ केलं पण आता मी गप्प बसणार नाही.”

आणखी वाचा- “तू ज्या वेदनेत…” आदिल खानची कोठडीत रवानगी होताच राखी सावंतच्या पहिल्या पतीचं मोठं वक्तव्य

दरम्यान राखी सावंतच्या आरोपांनंतर आदिल खानच्या वकिलाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आदिलला या सर्व गोष्टींमध्ये जाणीवपूर्वक अडकवण्यात आल्याचं त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे. याशिवाय राखीचा पूर्वाश्रमीचा पती राकेशनेही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व प्रकरणात राकेशने राखी सावंतला पाठिंबा दिला आहे. राखीच्या वाईट काळात मी नेहमीच तिच्यासाठी खंबीरपणे उभे राहीन असं त्याने म्हटलं आहे.