ड्रामा क्वीन राखी सावंत मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. राखीने पती आदिल खानवर गंभीर आरोप केल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो तुरुंगात आहे. राखीने आदिलला अटक झाल्यानंतर बरेच धक्कादायक खुलासे केले होते. त्यानंतर आता राखी सावंतचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ज्यात राखी सावंतने पती आदिल खानला टोला लगावला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये राखी सावंत मुंबई विमानतळावर उभी असलेली दिसत असून ती पापाराझींच्या प्रश्नांची उत्तरं देताना दिसत आहे. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत तिचं करिअर, पती आदिल खान आणि मोडलेलं लग्न याविषयी बोलताना दिसत आहे.
आणखी वाचा- “फॅशनच्या नादात लग्न…”, अवॉर्ड सोहळ्यातील ‘त्या’ व्हिडीओमुळे कियारा आडवाणी ट्रोल
व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणते, “काम करायला हवं. असं म्हणतात सीर सलामत तर पगडी पचास. आता तर मी उडायला शिकले आहे. पण खाली पडल्याशिवाय पुन्हा उठून उडण्यात मजा नाही. लोकांनी मला खूप खाली पाडलं. माझ्या पतीने मला फसवलं. एवढ्या चांगल्या हॉट बायकोला सोडून तो दुसरीकडे गेला. पण आता मला कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे.”
आणखी वाचा- “त्याची हिंमतच…”, राखी सावंत- आदिल खानच्या भांडणात कश्मीरा शाहची उडी
दरम्यान मागच्या काही दिवसांपासून आदिल खान दुर्राणीबरोबर राखी सावंतचे वाद सुरू आहेत. राखीने आदिलवर लैंगिक शोषण आणि मारहाणीचे आरोप लावले आहे. त्यानंतर त्याला पोलीसांनी अटक केली आहे. या दरम्यान आदिल खानवर एका इराणी तरुणीने मैसूरमध्ये बलात्काराचा गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.