scorecardresearch

गर्दीत बॅगेचा उल्लेख होताच बेशुद्ध राखी सावंतने उघडले डोळे, Video व्हायरल

आदिलच्या क्रूरतेला बळी पडलेल्या मुलींना न्याय मिळेल, असं म्हणताना अचानक राखी चक्कर येऊन खाली पडते. त्यानंतर…

rakhi sawant drama
(फोटो – व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानीविरोधात तक्रार दिली आहे. दोघांच्या नात्यात कटुता आली असून आदिलने मारहाण केल्याचा आरोप राखीने केला आहे. राखीने पतीविरोधात पोलिसांत तक्रारही दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आदिलला अटक करून कोर्टात हजर केलं होतं.

Video: “माझी बहीण ड्रामा क्वीन नाही” राखी सावंतच्या भावाचं वक्तव्य; आदिल खानच्या पहिल्या लग्नाबद्दल गौप्यस्फोट करत म्हणाला…

दरम्यान, राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती आदिलवर आरोप करताना दिसत आहे. मला मुंबई पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, मला न्याय मिळेल. आदिलच्या क्रूरतेला बळी पडलेल्या मुलींना न्याय मिळेल, असं म्हणताना अचानक राखी चक्कर येऊन खाली पडते. त्यानंतर तिला सर्वजण उचलून गाडीत बसवतात. तेवढ्यात पाठीमागे तिच्या पर्सचा उल्लेख कुणीतरी करतं आणि राखी अचानक मागे वळत तिची बॅग घेते आणि गाडीत बसते.

राखीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. ‘ती बेशुद्ध झाली तरी तिच्या हातातून फोन पडला नाही’. ‘राखीला काम नाही म्हणून ती ड्रामा करते’, अशा प्रकारच्या कमेंट्स करत काहींनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. तर, काहींनी सहानुभूती व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 17:03 IST
ताज्या बातम्या