अभिनेत्री राखी सावंतवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी (२८ जानेवारी) संध्याकाळच्या सुमारास राखीची आई जया यांचं निधन झालं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमर या आजाराशी झुंज देत होत्या. रुग्णालयामध्ये जया यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – ‘तू चाल पुढं’मध्ये काम करणाऱ्या अंकुश चौधरीच्या बायकोचं शिक्षण किती? स्वतःच खुलासा करत म्हणाली…
राखी तिच्या आईबरोबर अगदी शेवटपर्यंत होती. त्याचबरोबरीने राखीचा भाऊही या कठीण प्रसंगांमध्ये तिच्याबरोबर होता. आईच्या निधनानंतर राखी ढसाढसा रडताना दिसली. राखीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता तिच्या श्वानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राखीच्या जवळीलच एक व्यक्तीने तिच्या श्वानाला उचलून घेतलं. यावेळी या श्वानाने तिच्या आईजवळ जाऊन अंतिम दर्शन घेतलं. यावेळी राखी ढसाढसा रडत होती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. शिवाय राखीलाही काळजी घेण्याचा सल्ला तिचे चाहते देत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार मागच्या तीन वर्षांपासून राखी सावंतची आई जया ब्रेन ट्यूमर आणि कॅन्सरशी झुंज देत होत्या. त्यांचा कर्करोग किडनी आणि फुफ्फुसांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शरीराचे इतर अवयवही निकामी झाले होते. राखी सावंतला आईच्या उपचारांसाठी मुकेश अंबानी आणि सलमान खान यांनी खूप मदत केली होती.