scorecardresearch

Video: आदिल खानने घर सोडल्यानंतर राखी सावंत संतापली; त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव कॅमेऱ्यासमोर केलं जाहीर, म्हणाली…

आदिल आपल्याला सोडून गर्लफ्रेंडबरोबर राहत असल्याचंही राखीने सांगितलं आहे.

rakhi-sawant-takes adil-khan gf name
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत सातत्याने चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’तून बाहेर आल्यावर राखी सावंतची आई आजारी पडली आणि उपचारादरम्यान तिचं निधन झालं. त्यानंतर राखीच्या वैयक्तिक आयुष्यता वादळ आलं. पती आदिल खानचं अफेअर असल्याचं राखीने माध्यमांसमोर सांगितलं. तसेच तिचं लग्न टिकणार नसल्याचंही ती म्हणाली होती. त्यानंतर आदिलने अफेअर असणाऱ्या मुलीशी ब्रेकअप केलं असून तो आपल्याजवळ परत आलाय, असं राखी म्हणाली होती.

आधी म्हणाली नवऱ्याचं दुसऱ्याच मुलीबरोबर अफेअर, धमकीही दिली, आता राखी सावंतचा युटर्न, म्हणते, “आदिलची बदनामी…”

आता पुन्हा एकदा राखीने आदिलचं अफेअर आणि तिच्या गर्लफ्रेंडबद्दल भाष्य केलंय. तसेच आदिल आपल्याला सोडून गर्लफ्रेंडबरोबर राहत असल्याचंही राखीने सांगितलं. “आदिलच्या गर्लफ्रेंडचं नाव तनू आहे. तनू मला तुझी लाज वाटते. आदिल आता त्या मुलीबरोबर राहत आहे. ‘तुला वाटत असले कमी परत यावं, तर माफी माग, मी सर्व सोडून येऊन जाईन’, असं आदिल म्हणाला होता. पण तो परत आला नाही. दुसऱ्याच्या पतीला चोरून त्याच्याबरोबर राहणाऱ्या त्या मुलीला लाज वाटायला पाहिजे. माझाच पती खोटारडा आहे, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही,” असं राखी म्हणाली.

यावेळी राखीने आदिलची गर्लफ्रेंड तनुवर टीकाही केली. “माझ्या पतीला किती दिवस स्वतःजवळ ठेवशील. किती दिवस तू त्याच्याबरोबर राहशील” असं राखी म्हणाली आहे. दरम्यान, आता राखी म्हणतेय ती तनू नेमकी कोण आहे, याबदद्ल चर्चा सुरू झाली आहे. राखीच्या आईच्या निधनानंतरच आदिलने राखीचं घर सोडलं आणि आता तो तिच्या गर्लफ्रेंडबरोबर राहतोय.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 15:20 IST
ताज्या बातम्या