scorecardresearch

राखी सावंतने आदिलची मारहाण का सहन केली? खुलासा करत म्हणाली “माझ्या आईमुळे…”

“अजून किती सहन करु आई…”

rakhi sawant adil khan

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानीविरोधात तक्रार केली आहे. त्या दोघांच्या नात्यात कटुता आली असून आदिलने मारहाण केल्याचा आरोप राखीने केला आहे. राखीचा पती आदिलला पोलिसांनी अटक करुन कोर्टात हजर केल्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली. यानंतर आता राखीने त्याच्याबद्दल विविध गौप्यस्फोट केले आहेत.

राखीने नुकतंच प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी तिने आदिलने तिला कशाप्रकारे त्रास दिला, याबद्दल सांगितले. तसेच तिच्या आईने तिला सहन करण्याचा सल्ला दिला, याचाही उल्लेख तिने यावेळी केला.
आणखी वाचा : दुसऱ्याच मुलीबरोबर अफेअर ते मारहाणीचे आरोप, राखी सावंतच्या नवऱ्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

“आदिल गेल्या सात महिन्यांपासून मला त्रास देत आहे. मी मीडिया आणि लोकांच्या भीतीने कधीही समोर आले नाही. माझ्या आईनेही मला थोडं सहन कर असं सांगितलं होतं. लग्नानंतर एका महिलेचे जीवन हे असंच असतं. त्यामुळे थोडंसं सहन कर. त्यावेळी मी आईला विचारलं होतं, अजून किती सहन करु आई… मला त्रास होत आहे”, असे राखीने यावेळी सांगितले.

“त्याने मला ग्लास फेकून मारला. माझ्या घरी तुम्हाला येणं शक्य असेल तर या, मी तुम्हाला दाखवेन. रात्री पोलिसही घरी चौकशीसाठी आले होते. त्यांनीही घरातल्या वस्तू पाहिल्या”, असेही राखीने म्हटले.

आणखी वाचा – Video : राखी सावंतच्या पतीला पोलिसांनी अंधेरी कोर्टामध्ये केलं हजर, आदिल खानचा मास्कने तोंड लपवण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, राखीच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी आदिलला अटक केली होती. त्यानंतर आज त्याला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं आहे. ‘न्यूज १८ हिंदी’च्या वृत्तानुसार आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आदिलमुळे माझं आयुष्य उद्धवस्त झालं असल्याचं राखी सातत्याने म्हणत आहे. शिवाय आईच्या निधनाला जबाबदार आदिल असल्याचं राखीचं म्हणणं आहे. आता या दोघांमधील वाद आणखीन किती वाढणार? हे येत्या काही दिवसांमध्येच उघड होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 18:10 IST