scorecardresearch

आदिल खानसह राखी सावंतने केलेलं बाळाचं प्लॅनिंग; पतीच्या अटकेनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली…

आदिलच्या अटकेनंतर राखी सावंतचा मोठा खुलासा

rakhi sawant adil khan planning a baby
राखी सावंतचा मोठा खुलासा. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मॉडेल व अभिनेत्री राखी सावंतचा पती आदिल खानला मंगळवारी(७ फेब्रुवारी) ओशिवारा पोलिसांकडून अटक करण्यात आली. राखीने पतीविरोधात तक्रार करत त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आदिलचे दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचं राखीने कॅमेरासमोर उघड केलं होतं. आदिलच्या गर्लफ्रेंडचं नावही राखीने सांगितलं होतं. त्यानंतर आदिल व त्याच्या गर्लफ्रेंडचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आदिल गुन्हेगार असल्याचं आणि त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचा दावा राखीने केला आहे.

आदिलला अटक झाल्यानंतर राखीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखीने आदिलबरोबर केलेल्या कौटुंबिक प्लॅनिंगबाबत खुलासा केला आहे. आदिलच्या अटकेनंतर राखीने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टंट बॉलिवूड या पेजवरुन राखीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “मी व आदिल मूल होण्यासाठी प्लॅनिंग करत होतो” असा खुलासा राखीने व्हिडीओत केला आहे. या व्हिडीओत राखीने आदिलवर मारहाण केल्याचं गंभीर आरोपही केले आहेत. “गर्लफ्रेंडच्या प्रेमात आदिल वेडा झाला आहे.त्याने मला २८, ३० आणि ३१ तारखेलाही मारहाण केली आहे. कूपर रुग्णालयात मी उपचार घेण्यासाठीही गेले होते”, असं राखी म्हणाली आहे.

हेही वाचा>> शिव ठाकरेसाठी महेश मांजरेकरांची खास पोस्ट, ‘बिग बॉस’ स्टारचा फोटो शेअर करत म्हणाले…

राखी व आदिलने मे २०२२मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर त्यांनी निकाहही केला होता. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर येताच राखीने लग्नाबाबत खुलासा केला होता. परंतु, सुरुवातीला आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं नव्हतं. अनेक दिवस ड्रामा केल्यानंतर राखीशी विवाह केल्याचं आदिलने सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी राखीच्या आईचं निधन झालं. तेव्हाही आदिल गर्लफ्रेंडबरोबर असल्याचा खुलासा राखीने केला होता. आईच्या मृत्यूलाही राखीने आदिलला जबाबदार ठरवलं आहे.

हेही पाहा>>Photos: अटक झालेला राखी सावंतचा पती तिच्यापेक्षा १७ वर्षांनी लहान, जाणून घ्या आदिल खानची एकूण संपत्ती

राखीने आदिलवर मारहाण करण्याबरोबरच फसवणुकीचे आरोपही केले आहेत. आदिलने प्रसिद्धी मिळवण्यासाठी उपयोग केल्याचं राखी म्हणाली होती. याशिवाय पैसे घेतल्याचा आरोपही राखीने केला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 12:07 IST
ताज्या बातम्या