"इस्लाम धर्माचा..." नवऱ्यावर गंभीर आरोप करत राखी सावंतने स्वतःला म्हटलं गुणी पत्नी, नेमकं प्रकरण काय? | rakhi sawant talk about her divorce with husband adil khan durrani says i am loyal see details | Loksatta

“इस्लाम धर्माचा…” नवऱ्यावर गंभीर आरोप करत राखी सावंतने स्वतःला म्हटलं गुणी पत्नी, नेमकं प्रकरण काय?

राखी सावंतचा नवा व्हिडीओ व्हायरल, पती आदिल खानबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत

Rakhi sawant wedding rakhi sawant
राखी सावंतचा नवा व्हिडीओ व्हायरल, पती आदिल खानबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत

अभिनेत्री राखी सावंतच्या आईचं २८ जानेवारीला संध्याकाळच्या सुमारास निधन झालं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमर या आजाराशी झुंज देत होत्या. पण आता आईच्या निधनानंतर राखीवर नवं संकट आलं आहे. पुन्हा तिने पती आदिल खान दुर्रानीवर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. तसेच नवऱ्याचं अफेअर असल्याचंही राखीचं म्हणणं आहे.

आणखी वाचा – Video : “…तर आदिल खान व त्या मुलीचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करणार” राखी सावंतची नवऱ्याला धमकी

राखीने आदिलचं ज्या मुलीबरोबर अफेअर आहे तिला आता धमकी दिली आहे. राखी म्हणाली, “आता माझी आईच नाही तर यापुढे कोणतीही गोष्ट गमवल्याचं मला दुःख होणार नाही. मी ‘बिग बॉस मराठी’मध्ये जेव्हा दीड महिना होती तेव्हा त्याचा तू गैरफायदा घेतला आहेस. आता मी त्या मुलीचं नाव सांगत नाही. पण वेळ आल्यावर मी त्या मुलीचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करणार.”

यानंतर राखीने आदिलला तू मला घटस्फोटाची धमकी देऊ नकोस असं म्हटलं आहे. ती म्हणाली, “मी रोजा करणार. मी उमराह येथे जाणार. आदिल मला घेऊन गेला तर ठिक आहे. नाहीतर माझे मुस्लिम भाऊ आहेत त्यांना मी सांगणार की, मला उमराहला घेऊन जा. मी माझ्या देवाला मानते. मी सत्यवचनी पत्नी आहे.”

आणखी वाचा – “आमच्यात काही गोष्टी…” वैवाहिक आयुष्यात त्रास सहन करत होती मानसी नाईक, आता राहते एकटी

“मी खरेपणानेच इस्लाम धर्माचा स्वीकार केला. जर मी देवाला मानत असेल तर आदिल माझ्याकडे पुन्हा परत येईल. आदिल माझ्याबरोबर खरा वागला नाही तर तो इतर कोणत्याच मुलीबरोबर खरा वागणार नाही. मी त्याला माझं रक्त दिलं आहे. मी त्याला माझं सर्वस्व दिलं आहे. आदिल तू मला घटस्फोट देऊ शकत नाही. मी जगभरातील सगळ्या कोर्टमध्ये जाईन. तू मला घटस्फोटाची धमकी देऊ नको.” राखी आता घटस्फोट घेणार का? की यापुढे आणखी काही घडणार हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 18:21 IST
Next Story
Video : “पुरुषांची वृत्ती तशीच असते, पण एक स्त्री…” वैवाहिक आयुष्यात वादळ आल्यानंतर राखी सावंत संतापली