अभिनेत्री राखी सावंतवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी (२८ जानेवारी) संध्याकाळच्या सुमारास राखीची आई जया यांचं निधन झालं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमर या आजाराशी झुंज देत होत्या. रुग्णालयामध्ये जया यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. आता आईच्या निधनानंतरचा राखीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
राखी सध्या कठीण प्रसंगांचा सामना करत आहे. शिवाय आता तिने कॅमेऱ्यासमोर येत पुन्हा एकदा लग्नाचा ड्रामा सुरू केला आहे. जीममधून बाहेर येताना राखीला पापाराझी छायाचित्रकारांनी घेरलं. यावेळी राखी ढसाढसा रडताना दिसली. तसेच तिने आपल्या लग्नाबबतही यावेळी भाष्य केलं.
काय म्हणाली राखी सावंत?
“माझ्या वैवाहिक जीवनामध्ये येऊन कोणाला काय मिळतं? माझं लग्न धोक्यात आहे. देवा मला वाचव.” असं राखी सावंत व्हायरल व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. राखीचा हा ड्रामा पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून तिला चांगलंच सुनावलं आहे. तसेच प्रत्येक लग्नाचा ड्रामा राखी करत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
याआधीही आदिला खान दुर्रानीबरोबर लग्न झालं असल्याचं राखीने सांगितलं. त्यानंतर आदिलसह त्याच्या कुटुंबियांवरही राखीने आरोप केले. नंतर आदिलवर आपलं जीवापाड प्रेम आहे असं तिने सांगितलं. लग्नाचा हा ड्रामा सुरू असतानाच राखीच्या आईचं निधन झालं. आता पुन्हा एकदा राखीचं लग्न चर्चेचा विषय ठरत आहे.