अभिनेत्री राखी सावंतने आदिल खान दुर्रानीशी निकाह केला आहे. आदिलशी लग्न करण्यासाठी राखीने तिचं नावही बदललं आहे. तिने स्वतःचं नाव फातिमा असं ठेवलं आहे. राखी लग्नानंतर बुरखा घालून दिसली होती. त्यानंतर आता राखी दर्ग्यात पोहोचली आहे. राखी लग्नानंतर पहिल्यांदाच दर्ग्यात गेली आहे. तिचा दर्ग्याबाहेरील व्हिडीओ व्हायरल होत आहे.
“ती कधी मुस्लीम तर कधी…” राखी सावंतच्या लग्नाबद्दल पहिल्या पतीची प्रतिक्रिया
या व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणतेय की, “मी नुकतंच आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं आहे आणि पहिल्यांदाच मला दर्ग्यावर चादर चढवायची आहे. गरीब नवाज दरबारात, माझी प्रार्थना कबूल होवो. माझी आई बरी होवो आणि माझे लग्न यशस्वी होवो. सर्वांनी माझ्या लग्नासाठी प्रार्थना करावी अशी मी प्रार्थना करतो. एवढीच माझी इच्छा आहे.”
“गरीब नवाजचा उर्स सुरू आहे आणि मला माझ्या वतीने चादर द्यायची आहे. माझी दुवा कबूल होवो, इतकीच माझी इच्छा आहे,” असं राखी म्हणाली. यावेळी ती गुलाबी रंगाचा सूट परिधान करून डोक्यावर ओढणी घेऊन दिसली. तिने हातात दर्ग्यात चढवायची चादर घेतली होती.
राखी सावंत गेले काही दिवस तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत राहिली होती. अचानक लग्नाचे फोटो, व्हिडीओ शेअर करत तिने लग्नाचा गौप्यस्फोट केला होता. तसेच आदिल स्वीकारायला नकार देत असल्याचंही ती म्हणाली होती. परंतु नंतर आदिलने आपण राखीशी लग्न केलं असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर ते दोघेही एकत्र फिरताना आणि तिच्या आईच्या भेटीसाठी रुग्णालयात जाताना दिसतात.