अभिनेत्री राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. पतीविरोधात फसवणूक व मारहाणीचे आरोप तिने काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर तिचा पती आदिल खान दुर्रानीला पोलिसांनी अटक केली होती. सध्या आदिल पोलीस कोठडीत आहे. त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करणारी राखी आता पतीच्या जामिनाबद्दल बोलत आहे.

Video: “हा थेट जंगलातून…” अलाना पांडेच्या मेहेंदी सेरेमनीत पत्नीबरोबर पोहोचलेला बॉबी देओल ट्रोल

राखी सावंत विमानतळावर दिसली. पापाराझींशी संवाद साधताना राखी आदिलच्या जामिनाबाबत बोलली. “रमजान येत आहे. जेव्हा मी नमाज अदा करत होते तेव्हा मला वाटले की रमजान हा सर्वांना माफ करण्याचा पवित्र महिना आहे. मला वाटतं की मी आदिलला कधीच माफ करू शकणार नाही, पण त्याला म्हैसूर कोर्टातून जामीन मिळावा, अशी माझी इच्छा आहे. मी त्याच्यासाठी चांगली पत्नी होते, पण त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. मी त्याच्यावर इतकं प्रेम करायला नको होतं,” असं राखी म्हणाली.

“उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे…” रोहित शेट्टीने सांगितलेलं मराठी कलाकारांना चित्रपटांत घेण्यामागचं कारण

राखी पुढे म्हणाली, “त्याने जामिनावर बाहेर यावे अशी माझी इच्छा आहे. मात्र, आरोप अत्यंत गंभीर आहेत. मला त्याला माध्यमांतून संदेश द्यायचा आहे, ‘आदिल, तुला जामीन मिळाला तर कुणाचे आयुष्य उध्वस्त करू नकोस. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा आणि जर तू पुन्हा लग्न केलंस तर त्या व्यक्तीशी तू माझ्याशी जसं वागलास तसं वाईट वागू नकोस.’ तो जामिनावर बाहेर आल्यावरही मी त्याच्याकडे परत जाणार नाही. मला माझे आयुष्य एकट्याने जगायचे आहे. मी त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे.”

Video: “भारतातल्या मुली आळशी” मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “त्यांना असा नवरा हवा जो…”

जर आदिलला त्याची गर्लफ्रेंड तनु चंदेलसोबत लग्न करायचे असेल तर करू शकतो. मी त्यातून बाहेर पडली असून रमजानच्या पवित्र महिन्यात आपल्याला मनात बदल्याची भावना ठेवायची नाही, असं राखीने सांगितलं.