scorecardresearch

Video: आदिल खानविरुद्ध केलेल्या मारहाणीच्या तक्रारीनंतर राखी सावंत वैद्यकीय तपासणीसाठी रवाना, म्हणाली, “माझ्या जखमा…”

राखीने पती आदिल खान विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गेल्या सात महिन्यात आदिलने राखीला अनेकदा मारहाण केल्याचं तिने सांगितलं.

rakhi adil

राखी सावंत सध्या तिच्या आणि आदिल खानच्या नात्यामुळे चर्चेत आहे. त्या दोघांमधील दुरावा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तिचा पती आदिल खान याचं दुसऱ्याच एका मुलीबरोबर अफेअर असल्याचा खुलासा तिने दोन दिवसांपूर्वी केला होता. राखीने पती आदिल खान विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गेल्या सात महिन्यात आदिलने राखीला अनेकदा मारहाण केल्याचं तिने सांगितलं. तर आता तिची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

मे २०२२ मध्ये राखी सावंत ने आदिल खानशी लग्न केलं. परंतु लग्नानंतर तो राखीला त्रास देऊ लागला. त्याने अनेकदा राखीला मारहाण केली. तसंच आदींनी मारहाण केल्यानंतर राखीला झालेल्या जखमांचा व्हिडिओ ही तिच्या भावाने नुकताच समोर आणला. आता या सर्व प्रकारांनी नंतर आदिल खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर आता राखीची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. वैद्यकीय तपासणीसाठी जातानाचा तिचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : राखी सावंतने आदिलची मारहाण का सहन केली? खुलासा करत म्हणाली “माझ्या आईमुळे…”

व्हयरल होत असलेल्य व्हिडीओत राखी सावंत ओशिवरा पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताना दिसत आहे. तिथून ती मुंबईच्या कूपर हॉस्पिटलमध्ये जात आहे. या व्हिडीओत ती म्हणते, “मी वैद्यकीय तपासणीसाठी जात आहे. आता माझी वैद्यकीय तपासणी केली जाईल. माझ्या शरीरावर कुठे कुठे जखमा आहेत, आदिलने मला कसा त्रास दिला आहे हे सर्व मी डॉक्टरांना सांगणार आहे. ती तपासणी करण्यासाठी मी आता कूपर हॉस्पिटलमध्ये जात आहे.”

हेही वाचा : “ती काहीही बोलत आहे कारण…” राखी सावंतच्या वक्तव्यांवर अभिनेत्रीचा भाऊ राकेशची प्रतिक्रिया

दरम्यान राखीने केलेल्या तक्रारीनंतर आदिलला अंधेरी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. ‘न्यूज १८ हिंदी’च्या वृत्तानुसार आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 18:52 IST
ताज्या बातम्या