अभिनेत्री रकुल प्रीत सिंग व अभिनेता जॅकी भगनानी यांनी २१ फेब्रुवारीला गोव्यात लग्नगाठ बांधली. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर दोघांनी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. दोघांच्या लग्नातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यावेळी लग्नातील दोघांच्या लूकची चांगलीच चर्चा रंगली. आता दोघांच्या संगीत कार्यक्रमातील फोटो समोर आले आहेत.

रकुलने आपल्या इन्स्टाग्रामवर संगीत कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत दोघे एकमेकांचा हात पकडून कार्यक्रमस्थळी येताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत दोघे डान्स करताना दिसत आहेत. फोटोवरुन रकुल व जॅकीने संगीत कार्यक्रमात धमाकेदार डान्स केला असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा- एक दोन नव्हे तर शाहरुख खानकडे आहेत तब्बल ‘एवढे’ फोन, अभिनेत्याच्या जिवलग मित्राने केला खुलासा

रकुल प्रीतने तिच्या संगीत कार्यक्रमासाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनर फाल्गुनी पिकॉकने डिझाईन केलेला लेहेंगा परिधान केला होता. संगीतामध्ये, रकुलने पीच रंगाचा लेहेंगा घातला होता, ज्यावर एम्ब्रॉयडरी केली होती. तर गळ्यात रकुलने हिऱ्यांचा हार घातला होता. तर जॅकीने संगीत कार्यक्रमासाठी वेलवेटपासून बनवलेला गडद निळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. या लूकमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते.

दोन वेगवेगळ्या रीतीरिवाजानुसार बांधली लग्नगाठ

रकुल व जॅकीने पंजाबी आणि सिंधी रीतीरिवाजानुसार लग्नगाठ बांधली. रकुल पंजाबी आहे. त्यामुळे दोघांचा विवाह पहिल्यांदा ‘आनंद कारज’ (पंजाबी रीतीरिवाज)नुसार झाला. तर जॅकी हा सिंधी कुटुंबातील असल्यामुळे पंजाबी पद्धतीने लग्न केल्यानंतर त्यांनी सिंधी पद्धतीने पुन्हा एकदा लग्न केले. लग्नानंतर दोघांनी पाहुण्यांसाठी पार्टीही आयोजित केली होती.

हेही वाचा- लग्नानंतर रकुल प्रीत सिंगने सासरी पहिल्यांदा बनविला ‘हा’ खास पदार्थ; फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

पर्यावरणस्नेही पद्धतीने केले लग्न

रकुल व जॅकी पर्यावरणस्नेही पद्धतीने लग्न केले. दोघांनी आपल्या लग्नात नो-क्रॅकर पॉलिसी पर्यायाचा अवलंब केला होता. तसेच दोघांच्या कुटुंबीयांनी कोणत्याही पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका पाठवली नव्हती. दोघांनी नातेवाइकांपासून मित्र-परिवारापर्यंत प्रत्येकाला ई-इन्व्हिटेशन पाठविले होते.