Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding: बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा लग्नसोहळा बुधवारी (२१ फेब्रुवारी २०२४ ) गोव्यात पार पडणार आहे. या जोडप्याच्या लग्नाआधीच्या विधींना आता सुरुवात झाली आहे. जॅकी-रकुलच्या लग्नाला कुटुंबीयांसह अनेक बॉलीवूड कलाकार आणि जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित राहणार आहे.

जॅकी भगनानी हा रितेश देशमुखच्या वहिनीचा सख्खा भाऊ असल्याने संपूर्ण देशमुख कुटुंबीय या लग्नसोहळ्यासाठी गोव्यात पोहोचलं आहे. लातुर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांची पत्नी दिपशिखा देशमुख ही जॅकी भगनानीची सख्खी मोठी बहीण आहे. गोव्यात नुकताच जॅकी व रकुलचा हळदी समारंभ पार पडला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : “एवढा मोठा घोडा झालाय अन्…”, नुपूरचे ‘ते’ शब्द ऐकताच आई झाडू घेऊन धावली, पाहा आमिर खानच्या जावयाचा Video

रकुल प्रीत व जॅकीचे कुटुंबीय हळदी समारंभानंतर पापाराझींसमोर आले होते. त्यांनी सगळ्या पाहुण्यांची व पापाराझींची विचारपूस करून आभार मानले. ज्येष्ठ निर्माता वाशू भगनानी म्हणजेच जॅकीचे वडील व बहीण दीपशिखा यांनी पापाराझींसमोर एकत्र पोज देत, “नवीन जोडपं लग्न झाल्यावर उद्या तुमच्यासमोर येईल, तुम्ही वेळात वेळ काढून मुंबईहून इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार” असं सांगितलं.

हेही वाचा : “ओS मानेS याSSS”, जेव्हा विमानात शिरताच किरण मानेंना ऐकू आला आवाज; म्हणाले, “दचकून बघितलं तर…”

दीपशिखा व निर्माते वाशू भगनानी यांच्यानंतर रकुलचे आई-बाबा देखील पापाराझींसमोर आले होते. त्यांनी देखील लेकीच्या लग्नासाठी आलेल्या सर्व पाहुण्याचं मोठ्या आनंदाने स्वागत केलं. “तुम्ही या जोडप्याला भरभरून शुभेच्छा द्याव्यात अशी आमची इच्छा आहे. उद्या दोन्ही मुलं तुम्हाला भेटायला बाहेर येतील. आम्हाला आमचा आनंद तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल.” असं अभिनेत्रीच्या पालकांनी सांगितलं. हे दोन्ही व्हिडीओ  ‘वूम्प्ला’ या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नातील संगीत कार्यक्रम २० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता सुरू होईल. यावेळी सगळ्या पाहुण्यांना खास ड्रेसकोड देण्यात आला आहे तसेच बॉलीवूड थीमचं आयोजन करण्यात आलं आहे.

Story img Loader