Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं बॉलीवूड कपल रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी अखेर लग्नबंधनात अडकलं. २१ फेब्रुवारीला गोव्यात मोठ्या थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी वरुण धवनपासून ते शिल्पा शेट्टी अक्षय कुमारपर्यंत अनेक बॉलीवूड कलाकार गोव्याला पोहोचले होते. एवढंच नाही तर रकुल व जॅकी या दोघांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील खास पत्राद्वारे लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी यांचं दोन पद्धतीत लग्न झालं. शीख व सिंधी पद्धतीने दोघांनी लग्न केलं. या लग्नाचा संपूर्ण व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये संगीत, मेहंदी, हळद या सोहळ्यातील खास क्षण पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – भगरे गुरुजींच्या लेकीनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीने तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेचं केलं केळवण, फोटो शेअर करत म्हणाली…

The Wedding Filmer या पेजवर रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी यांच्या लग्नाचा पूर्ण व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत सुरुवातीलाच रकुलची लग्नातली एन्ट्री पाहायला मिळत आहे. लग्नात रकुलने पेस्टल शेड्सचा लेहेंगा घातला होता. तर जॅकीने क्रीम रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघंही या हटके लूकमध्ये खूप सुंदर दिसत होते.

रकुल व जॅकीचं २१ फेब्रुवारीला सकाळी शीख पद्धतीत लग्न झालं. त्यानंतर सिंधी परंपरेनुसार दोघांनी लग्न केलं. हे लग्न होताच जॅकीची सख्खी बहीण दीपशिखा देशमुखने पती, आमदार धिरज देशमुख यांच्यासह सर्व पापाराझींना मिठाई वाटली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रकुल प्रीत सिंग-जॅकी भगनानी यांना दिल्या लग्नाच्या खास शुभेच्छा, नवविवाहित जोडप्यासाठी पाठवलं पत्र

दरम्यान, रकुल व जॅकी प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर, दोघं एकाच बिल्डिंगमध्ये राहत होते आणि दोघं एकमेकांचे शेजारी होते. पण तरीही दोघांमध्ये कधीच जास्त बोलणं होतं नव्हतं. दोघांची पहिली भेट लॉकडाऊनच्या वेळी झाली होती. ३ ते ४ महिने दोघांची चांगली मैत्री होती. त्यानंतर दोघं रिलेशनशिपमध्ये आले. ४ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आता दोघं लग्नबंधनात अडकले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakul preet singh and jackky bhagnani wedding video viral watch all ceremony pps
First published on: 23-02-2024 at 14:52 IST