Rakul Preet Singh Fitness Secret: कलाक्षेत्रातील अनेक कलाकारांना पाहिल्यानंतर आपणही त्यांच्याप्रमाणे असावे, असे अनेक चाहत्यांना वाटते. त्यांच्या फिटनेसची, त्यांच्या सौंदर्याची भुरळ वेळोवेळी पडत असते.
आपले आवडते कलाकार फिट राहण्यासाठी नेमकं काय करत असतील, त्यांची जीवनशैली नेमकी कशी असेल, त्यांचा आहार कसा असेल, ते काय खात असतील, ते कोणता व्यायाम करत असतील. हे कालकार स्वत:ची काळजी कशी घेत असतील, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात.
आता अनेक कलाकार त्यांच्या डाएटबद्दल, त्यांच्या जीवनशैलीबद्दल, ते काय खातात, काय खात नाहीत, ते व्यायाम किती करतात, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ते कोणत्या गोष्टी करतात, या सगळ्याबद्दल बोलतात. अनेक खुलासे करतात. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुनदेखील ते त्यांच्या जीवनशैलीतील अनेक गोष्टी शेअर करतात.
आता अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने ती कोणते सहा पदार्थ खात नाही, याची यादी सांगितली आहे. रकुलने नुकतीच द रणवीर शोला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या आहाराबद्दल काही खुलासे केले.
रकुलने अशा काही पदार्थांची नावे सांगितली, जी लोकांना प्रचंड आवडतात. त्याची नावे सांगण्यापूर्वी ती म्हणाली, “असे नाही की त्या पदार्थांचा एक घासही खाल्ला नाही. मला एखादा तुकडा खाण्याची सवय आहे.” गमतीने ती असेही म्हणाली, “ही नावे ऐकल्यानंतर लोक मला शिव्या देतील.”
१. वडापाव
रकुल वडापाव खात नाही. ती म्हणाली की वडापाव खाण्यापेक्षा मी प्रोटीन बार खाण्याला पसंती देईन. रकुल असे म्हणाली तरी वडापाव हे अनेकांचा आवडता पदार्थ आहे.
२. जिलेबी
वेगवेगळ्या ठिकाणी मिळणारी जिलेबी ही अनेकांनी आवडती असते. मात्र, रकुल मात्र जिलेबी खात नाही. ती खुलासा करत म्हणाली की अतिगोड आणि तेलात तळलेले पदार्थ मी खात नाही. माझ्या आईला जिलेबी खूप आवडते, मला मात्र आवडत नाही.
३. छोले भटुरे
छोटे भटुरे बऱ्याचजणांना आवडतात. मी छोले खाते, भटुरे खात नाही.
४.भजी
पावसाळ्यात किंवा संध्याकाळी अनेकजण भजी खातात. मात्र, रकुल म्हणाली मला भजी आवडत नाही.
५. बटर चिकन
जेव्हा मी एका रेस्टॉंरंटमध्ये चिकन बनवताना पाहिले होते. त्यामध्ये त्यांनी चार पॉकेट बटर टाकले होते. मी चार दिवस व्यायाम केला तरी माझं वजन कमी होणार नाही.
६. चीजकेक
रकुल चीजकेकदेखील खात नाही.
