Bollywood actress shares skin care routine: वाढते प्रदूषण, असंतुलित आहार, पाणी कमी पिणे, वेळेत न झोपणे, कमी झोपणे, व्यायाम न करणे, फास्ट फूडचे प्रमाण जास्त असणे या आणि अशा अनेक कारणांमुळे आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
याबरोबरच अशाच कारणांमुळे त्वचेच्या समस्या निर्माण होणे, केसगलती सामना करावा लागणे अशा समस्यांचा अनेकांना सामोरे जावे लागते. बरेचजण त्वची चांगली राहावी यासाठी यासाठी विविध उपाययोजना करतात. घरातील काही वस्तूंचा वापर करून त्वचा निरोगी राहावी यासाठी काळजी घेतात.
आता लोकप्रिय अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने एका मुलाखतीत ती तिच्या त्वचेची कशी काळजी हे सांगितले आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे, हे जाणून घेऊ…
रुकुल प्रीत सिंगने नुकतीच ह्युमन्स ऑफ बॉम्बेला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तुझी स्कीन केअर रूटीन काय आहे, असे विचारले. त्यावर ती म्हणाली, “काही घरगुती उपाय आहेत. जसे की हळद आणि बेसन (डाळीचं पीठ) यांचे मिश्रण करून ते मी लावते. तसेच बनाना मास्क (Banana Mask) आहे.”
“जेव्हा त्वचा कोरडी वाटते…”
बनाना मास्क म्हणजे नेमकं काय? असे विचारल्यानंतर रकुल म्हणाली, “थोडं दही घ्या, एक केळ घ्या, मध घ्या. ते सगळं एकत्र करायचं आणि बारीक करायचं. हे मिश्रण चेहऱ्यावर लावायचं. या मास्कमुळे त्वचा मऊ होते.”
पुढे अभिनेत्री असेही म्हणाली, “तुमची त्वचा कशी आहे, त्यावरून हे ठरतं की त्या त्वचेवर काय लावायचं आहे. जेव्हा त्वचा कोरडी वाटते असते, त्यावेळी बनाना मास्क लावते. ज्यावेळी त्वचा तेलकट वाटते, त्यावेळी मी हदळ आणि बेसन लावते. बेसन,चिमुटभर हळद, थोडासा मध किंवा कच्चे दूध हे मिश्रण करून लावते. चेहरा टॅन होतो (काळा पडतो) तो घालवण्यासाठी हे मिश्रण उत्तम आहे. जेव्हा आऊटडोअरला शूटिंग करत असते, त्यावेळी मी टमाटरचे काप चेहऱ्यावर ठेवते.”
रकुल पुढे असे म्हणाली, “मी माझ्या आईला असे करताना पाहिले आहे. ती जे फळ खात असते, ते ती चेहऱ्यालाही लावते. जर पपई खात असेल तर ती पपई चेहऱ्यावर लावते. मी तिला हे करताना पाहिले आणि तेच मीही करते”, असे म्हणत रकुलने ती तिच्या त्वचेची कशी काळजी घेते हे सांगितले.
रकुलबरोबरच अनेक अभिनेत्री, अभिनेते त्यांच्या जीवनशैलीबद्दल खुलेपणाने सांगतात. याबरोबरच, अनेजण त्यांच्या डाएट, व्यायाम याबद्दलही खुलासे करतात. अक्षय कुमार, करीना कपूर खान, तमन्ना भाटिया, भूमी पेडणेकर, नाना पाटेकर, अक्षय खन्ना हे आणि इतर कलाकार त्यांच्या दिनचर्येबद्दल विविध मुलाखतींमध्ये बोलले आहेत.
