अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. पण यावर्षी तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही चांगली कामगिरी करू शकले नाहीत. पण आता पुन्हा एकदा तिने कंबर कसली आहे. आगामी चित्रपटासाठी ती खूप मेहनत घेताना दिसतेय.

रकुल सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. तिचा नवीन येणारा चित्रपट हा अगदी वेगळ्या विषयावर आधारित असणार आहे. ह्या चित्रपटासाठी ती दिवस-रात्र मेहनत घेत आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर तिचा एक फोटो पोस्ट करत या चित्रपटाचे शूटिंग तिच्यासाठी किती कठीण आहे हे सांगितलं. या चित्रपटासाठी तिने १ किंवा २ नव्हे, तर तब्बल ११ तास सलग पाण्यात शूटिंग केलं.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

आणखी वाचा : “सगळं आहे पण तू नाहीस…” शाहरुख खानला ‘पठाण’मध्ये हवा होता ‘हा’ आघाडीचा अभिनेता, व्यक्त केलं दुःख

रकुलने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतीच एक स्टोरी पोस्ट केली. या स्टोरीमध्ये पोस्ट केलेल्या तिच्या फोटोत ती भिजलेली दिसत असून स्वतःभोवती आणि डोक्यावर टॉवेल गुंडाळून काढा पिताना दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “मी हे आतापर्यंत केलेलं सर्वात कठीण शूटिंग आहे. सलग ११ तास मी पाण्यात शूटिंग करत आहे आणि त्यामुळे वाजणारी थंडी ही माझ्यासाठी खूप समाधानकारक आहे. यात मला हा काढा ऊब देण्याचं काम करतोय.”

हेही वाचा : आयुष्मान खुरानाचा ‘डॉक्टर जी’ थिएटरनंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर नशीब आजमावण्यासाठी सज्ज

रकुलची ही स्टोरी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. रकुलचं कामाबद्दलचं डेडिकेशन बघून सर्वजण तिचं कौतुक करत आहेत. तिच्या चाहत्यांनी तिचं हे डेडिकेशन पाहून ते सर्वजण या तिच्या आगामी चित्रपटासाठी उत्सुक असल्याचं सांगत आहेत.