scorecardresearch

Video: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल

राम गोपाल वर्मा यांचा तेलुगु अभिनेत्रीबरोबरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल
राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल. (फोटो: राम गोपाल वर्मा/ युट्यूब)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकांमध्ये राम गोपाल वर्मा यांचा समावेश होतो. ‘सरकार’, ‘रन’, ‘वीरप्पन’, ‘आग’ अशा हिट चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटांमुळे, वक्तव्यांमुळे ते अनेकदा चर्चेतही असतात. परंतु, सध्या ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.

राम गोपाल वर्मा यांचा एका अभिनेत्रीबरोबरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राम गोपाल वर्मा अभिनेत्रीच्या पायाला किस करताना दिसत आहेत. राम गोपाल वर्मा व अभिनेत्रीने याचे फोटो, व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

हेही वाचा>> Video: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केली नवी कार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

हेही वाचा>>“हिंदीत कितीही मोठं काम केलं तरी…” स्वप्निल जोशीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवरुन या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या पायाला किस करुन ते थांबले नाहीत तर त्यानंतर त्यांनी तिचे पाय चोखलेही आहेत. “डेंजरस आशू रेड्डीबरोबरचा संपूर्ण व्हिडीओ..तुमच्या जोखीमेवर बघा” असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा>> “आम्हाला मार्गदर्शन करण्याबरोबरच…” अनिल कपूर यांच्या ट्वीटनंतर जितेंद्र जोशीने शेअर केली भावूक पोस्ट

राम गोपाल वर्मांसह व्हिडीओमध्ये दिसणारी अभिनेत्री तेलुगु चित्रपटसृष्टीतील आहे. आशू रेड्डी असं तिचं नाव असून तिने अनेक तेलुगु चित्रपटांत काम केलं आहे. ‘बिग बॉस तेलुगु’ तिसऱ्या पर्वातही ती सहभागी झाली होती. राम गोपाल वर्मा यांनी आशू रेड्डीला मुलाखत दिली आहे. त्याच मुलाखतीमधील हा व्हिडीओ आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 10:42 IST

संबंधित बातम्या