scorecardresearch

दारूच्या नशेमध्ये राम गोपाल वर्मा यांचं ट्वीट, राजामौली यांना दिली धमकी, म्हणाले, “मी तुम्हाला…”

दारूच्या नशेमध्ये राम गोपाल वर्मा यांचं ट्वीट, एस.एस.राजामौली यांना दिली धमकी

दारूच्या नशेमध्ये राम गोपाल वर्मा यांचं ट्वीट, राजामौली यांना दिली धमकी, म्हणाले, “मी तुम्हाला…”
दारूच्या नशेमध्ये राम गोपाल वर्मा यांचं ट्वीट, एस.एस.राजामौली यांना दिली धमकी

दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांची सध्या जगभरात चर्चा आहे. राजामौली यांचे चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी असते. त्यांचा ‘आरआरआर’ चित्रपट तर अगदी सुपरहिट ठरला. आता हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीमध्ये पोहोचला आहे. दरम्यान राजामौली यांच्यासह दाक्षिणात्य चित्रपटांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. दरम्यान राम गोपाल वर्मा यांनी राजामौली यांचा उल्लेख करत एक ट्वीट केलं आहे.

आणखी वाचा – आधी ओलीचिंब भिजत वनिता खरातने नवऱ्याला केलं किस, आता मिठी मारत शेअर केला रोमँटिक फोटो, म्हणाली…

राम गोपल वर्मा यांनी २३ जानेवारी (सोमवारी) रात्री एक ट्वीट केलं. दारूच्या नशेमध्ये ट्वीट केलं असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं. पण या ट्वीटमध्ये त्यांनी राजामौली यांना धमकी दिली आहे. तसेच राजामौली यांना राम गोपाल वर्मा यांनी त्यांची सुरक्षा यंत्रणा वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले राम गोपाल वर्मा?

“एस.एस.राजाममौली सर तुमची सुरक्षा यंत्रणा वाढवा. कारण भारतात चित्रपट निर्मात्यांचा असा एक गट आहे जो इर्षेपोटी तुम्हाला मारण्यासाठी तयार आहे. त्याचा मीदेखील एक भाग आहे. मी तुम्हाला आता हे रहस्य सांगितलं आहे. कारण मी दारूच्या नशेमध्ये आहे.” असं राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट केलं आहे.

सध्या राम गोपाल वर्मा यांचं हे ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे. एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाने जगभरातून १००० कोटींपेक्षा अधिक कमाई केली. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत होते. तर आलिया भट्टचीही यामध्ये महत्त्वाची भूमिका होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 11:17 IST

संबंधित बातम्या