scorecardresearch

अभिनेत्रीच्या पायाला किस केल्यानंतर आता दुसरीच्या कमरेत हात टाकून राम गोपाल वर्मांचं फोटोशूट, फोटो शेअर करत म्हणाले…

राम गोपाल वर्मा यांचा नवा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

अभिनेत्रीच्या पायाला किस केल्यानंतर आता दुसरीच्या कमरेत हात टाकून राम गोपाल वर्मांचं फोटोशूट, फोटो शेअर करत म्हणाले…
राम गोपाल वर्मा यांचा नवा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

बॉलिवूडचा दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा एक किळसवाणा प्रकार नुकताच समोर आला. त्यांनी अभिनेत्रीच्या पायाला किस करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला. तेलुगू चित्रपटात काम करणाऱ्या आशू रेड्डीबरोबर त्यांनी हे कृत्य केलं. मुलाखतीदरम्यान त्यांनी हे कृत्य करत त्याचा संपूर्ण व्हिडीओ युट्युबवरही शेअर केला. आता आणखी एका अभिनेत्रीबरोबरचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा – Video : गर्दीतच हात पकडला, सेल्फी घेतला अन्…; भाऊ कदमची लेक व रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल

राम गोपाल वर्मा यांची अभिनेत्रींशी असलेली जवळीक पाहून नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. ते त्यांचा आगामी चित्रपट ‘डेंजरस’च्या प्रमोशनसाठी चित्रपटामधील अभिनेत्रींशी जवळीक साधत आहेत. आता राम गोपाल वर्मा यांनी ‘डेंजरस’ची अभिनेत्री अप्सरा रानीबरोबर फोटो शेअर केला आहे.

अप्सरा रानीच्या कंबरेमध्ये हात टाकत त्यांनी फोटो शेअर केला आहे. यावरुनच त्यांना पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आलं आहे. राम गोपाल वर्मा यांनी अप्सरा रानीबरोबरचो फोटो शेअर करत म्हटलं की, “मी आणि अप्सरा रानी ‘डेंजरस’ चित्रपटाचा ८.४५शो पाहण्यासाठी प्रसाद मल्टिप्लेक्स स्क्रिन ५ येथे जात आहोत.”

आणखी वाचा – डोक्यावर टोपी, कपाळी टिळा अन्…; पूर्वाश्रमीच्या पत्नीबरोबर आमिर खानने केली पूजा, आरती करतानाचेही फोटो व्हायरल

या फोटोमध्ये अभिनेत्रीने बोल्ड ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. तर राम गोपाल वर्मा यांनी जीन्स व टी-शर्ट परिधान केलं आहे. पण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राम गोपाल वर्मा कोणत्याही थराला जाऊ शकतात हे त्यांच्या व्हिडीओ व फोटोंवरून सिद्ध झालं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 15:14 IST

संबंधित बातम्या