Ramayana collection day 1 early report: ‘रामायण’ हा सिनेमा आज(५ नोव्हेंबर २०२६)ला प्रदर्शित झाला आहे. आता या सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली आहे, याबद्दल जाणून घेऊ…

भारतासह जगभरात या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

रणबीर कपूरच्या ‘रामायण’ सिनेमाने पहिल्या दिवशी किती केली कमाई?

पहिल्या दिवशीच्या (५ नोव्हेंबरच्या) संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, ‘रामायण’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५४.८३ कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. तर, ४६.४७ कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. सर्व भाषांतून सिनेमाने इतकी कमाई केली आहे.

या एकूण कमाईमध्ये हिंदी भाषेचा सर्वाधिक वाटा आहे. सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने १५,६५१ शोमधून ३३.८९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. कन्नड भाषेतील ९३६ शोमधून ५.३७ कोटी रुपये कमावले आहेत.

तेलुगू व्हर्जनचे १,३५२ शो झाले असले तरी त्यातून ४.४१ कोटी रुपयांची कमाई झाली. तमिळ व्हर्जनने ७४० शोमधून १.८२ कोटी रुपये कमावले, तर मल्याळममध्ये सर्वात कमी कमाई झाली. सिनेमाने मल्याळम भाषेतून फक्त फक्त ९८ लाख कमावले आहेत.

‘रामायण’ची अॅडव्हान्स बुकिंगला २० ऑक्टोबरला सुरुवात झाली होती. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाच्या १२ लाख तिकिटांची विक्री झाली होती. यातून ५०.०८ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई झाली. मात्र, ब्लॉक बुकिंगमधील आकडे वगळल्यानंतर ही कमाई ४२.९६ कोटी रुपये झाली.

रामायणची ही कमाई संध्याकाळी सहा पर्यंतची आहे. मात्र, संध्याकाळच्या आणि रात्रीच्या शोमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे म्हणले जात आहे. ‘रामायण’ची पहिल्या दिवसाची जगभरातील एकूण कमाई जवळपास १६० कोटी होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता सिनेमाची पहिल्या दिवशीची किती कमाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.