Dipika Chikhlia Reaction on Ramayana Teaser: धुरंधर या सिनेमाने प्रचंड कमाई केली. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत सर्वांत जास्त कमाई करणारा ‘धुरंधर’ सिनेमा ठरला. चित्रपटाचा विषय, मांडणी आणि कलाकार या सगळ्यामुळेच हा सिनेमा गाजला. फक्त ‘धुरंधर’च नाही,तर ‘धुरंधर २’देखील सध्या मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे.

‘धुरंधर २’नंतर आणखी एका सिनेमाने लक्ष वेधले आहे. हा सिनेमा म्हणजे रामायण. नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरवर प्रेक्षक आणि कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यामध्ये अभिनेता रणबीर कपूर प्रभू रामांच्या भूमिकेत आहे.

रामायण मालिका पुन्हा एकदा चर्चेत

रामायण सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर रामानंद सागर निर्मित रामायण या मालिकेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. ३९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेली ही मालिका प्रचंड गाजली होती.

Award Banner

या मालिकेतील अनेक पात्रे लोकप्रिय ठरली. पडद्यावर दिसणाऱ्या या कलाकारांना लोक खरोखरच प्रभू राम आणि सीता मानू लागले. इतकी त्यांची लोकप्रियता वाढली होती.

रामायण मालिकेत प्रभू राम ही भूमिका अभिनेते अरुण गोविल यांनी साकारली होती; तर सीतेच्या भूमिकेत दीपिका चिखलिया दिसल्या होत्या. त्यांनी त्यांच्या अभिनयातून त्यांच्या पात्राला न्याय दिला होता. आता रामायण सिनेमाचा टीझर पाहिल्यानंतर दीपिका चिखलिया यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दीपिका चिखलिया रणबीर कपूरच्या रामायण सिनेमाबद्दल काय म्हणाल्या?

इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी रामायण सिनेमाच्या टीझरबद्दल वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, “मी टीझर पाहिला. हा खूप मोठा सिनेमा आहे. त्यांनी खूप उत्तम पद्धतीनं बनवला आहे. त्यामुळे आता मी चित्रपटाची वाट पाहत आहेत. हा खूप सुंदर सिनेमा असेल यामध्ये काहीच वाद नाही.”

आता प्रेक्षक ट्रेलर आणि चित्रपट प्रदर्शित होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.