रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींचा धाकटा लेक अनंतच्या प्री-वेडिंग सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी गुजरातमधील जामनगरमध्ये तीन दिवसीय भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला संपूर्ण बॉलीवूड कलाविश्व एकत्र अवतरल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये रणबीर-आलियाची गोड लेक राहा कपूरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

रणबीर-आलियाने जामनगरला लेक राहासह खास उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीच्या गोंडस लेकीने सर्वांचं मन जिंकलं. प्री-वेडिंगमधील राहाचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पहिल्याच दिवशी राहा अनंत अंबानींना भेटल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत होता. आता प्री-वेडिंग सोहळ्यातील आणखी एक इनसाइड व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

हेही वाचा : Video : “केम छो?” नीता अंबानींनी गुजरातीत घेतली दिलजीत दोसांझची शाळा, गायकाचं उत्तर ऐकून सगळेच भारावले

रणबीर कपूरने या व्हिडीओमध्ये राहाला उचलून घेतल्याचं पाहायला मिळत आहे. प्री-वेडिंगच्या अखेरच्या दिवशी अभिषेक बच्चनने पहिल्यांदाच रणबीर-आलियाची लेक राहाशी संवाद साधला. बच्चन कुटुंबीय जामनगरच्या कार्यक्रमात शेवटच्या दिवशी सहभागी झाले होते. यावेळी राहा दिसताच अभिषेकने तिला हॅलो केलं. परंतु, ओळख नसल्याने राहा लगेच रणबीरला बिलगल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video: अभिषेक बच्चनने ऐश्वर्या व लेकीसह केलं एंजॉय; आराध्याचा नवा लूक पाहून नेटकरी म्हणाले, “इतक्या वर्षांनी हिचं…”

प्री-वेडिंग सोहळ्यातील राहाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, रणबीर-आलियाची लेक राहा केवळ दीड वर्षांची आहे. या जोडप्याने गेल्यावर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने पहिल्यांदा लेकीला माध्यमांसमोर आणलं होतं.