Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: देशाचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानींचा छोटा मुलगा अनंत अंबानी यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात गुजरातमधील जामनगर येथे सुरू आहे. हॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंतचे कलाकार मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. १ मार्चपासून सुरू झालेल्या या प्री-वेडिंग कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस आहे. काल, दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा पार पडला. ज्यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींचा जबरदस्त डान्स पाहायला मिळाला. बऱ्याच काळानंतर तीन खान एकत्र परफॉर्मन्स करताना दिसले. सध्या याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत.

अनंत-राधिका यांच्या संगीत सोहळ्यात रणबीर कपूर-आलिया भट्टने आकाश अंबानी-श्लोका मेहतासह भन्नाट डान्स केला. याचे व्हिडीओ रणबीर, आलियाच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये बॉलीवूडच्या क्यूट कपलसह आकाश अंबानी-श्लोका मेहता ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटातील सुपरहिट गाणं ‘केसरिया’वर डान्स करताना दिसत आहेत. याचे व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आले आहेत.

A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
ravi jadhav wife scuba diving on gulabi sadi
Video : ‘गुलाबी साडी’ गाण्यावर खोल समुद्रात डान्स! स्कूबा डायव्हिंग करताना रवी जाधव यांच्या पत्नीचा हटके अंदाज
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?
myra vaikul sukanya mone and supriya pathare dance on nach ga ghuma
“नाच गं घुमा कशी मी नाचू…”, छोट्या मायराचा सुकन्या मोने अन् सुप्रिया पाठारेंसह जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा – Video: गोंडस राहा कपूर जेव्हा अनंत अंबानींना भेटते, प्री-वेडिंग सोहळ्यातील आलियाचा लेकीसह व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, करिना कपूर, सैफी अली खान, जान्हवी कपूर, शिखर पहाडिया, सोनम कपूर, आनंद आहुजा, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख, अर्जुन कपूर, सुहाना खान, नव्या नवेली नंदा, टायगर श्रॉफ, करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, सोनाली बेंद्रे, नताशा पूनावालासह बॉलीवूडचे सेलिब्रिटी उपस्थित आहेत.

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये शाहरुख खानचा ‘जय श्रीराम’ नारा, अभिनेता अंबानी कुटुंबातील ‘त्रिमुर्ती’बद्दल म्हणाला….

आज अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे. आज ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ हा कार्यक्रम आहे. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम असून यात पाहुण्यांना जामनगर फिरवलं जाणार आहे. तर दुसरा कार्यक्रम भारतीय पेहरावात असणार आहे.