Raha Kapoor viral video : बॉलीवूडमधील रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) या जोडीची सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते. या जोडीची लेक राहाचा (Raha Kapoor) जन्म झाल्यापासून राहाच्या आई-बाबांपेक्षा चाहते तिचीच अधिक चर्चा करतात. राहासुद्धा आई आलिया भट्टबरोबर अनेकदा विमानतळावर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी दिसते. रणबीर कपूर आणि आलिया भट्टबरोबर तिचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होतात. राहाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यात ती रणबीर कपूर आणि आलिया भट्टबरोबर एका फुटबॉलच्या स्टेडियममध्ये दिसत आहे.

शनिवारी (३० नोव्हेंबर २०२४ रोजी) मुंबईतील फुटबॉल स्टेडियममध्ये रणबीरची टीम ‘मुंबई सिटी एफसी’ आणि ‘हैदराबाद एफसी’ यांच्यातील सामन्यादरम्यान आलिया आणि रणबीर राहासह दिसले. आधीच्या काही फोटोंमधून रणबीर, आलिया आणि राहा स्टँड्समध्ये बसलेले दिसले होते. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमधून राहा सामन्यानंतर मैदानावर धमाल करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या
rasha thadani 12 th studies on set
Video : राशा थडानीने ‘आझाद’च्या सेटवर केला बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास; व्हायरल व्हिडीओत अभिनेत्री म्हणाली, “१० दिवसांत…”
khushi and janhvi kapoor dance with boney kapoor
Video: श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांचा लेकींबरोबरचा मजेशीर अंदाज पाहिलात का? व्हिडीओ होतोय व्हायरल
Lakhat Ek Aamcha Dada
Video : महेश जाधवचा अभिनेत्रीबरोबर जबरदस्त डान्स; जुई तनपुरे व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमचा मावळा…”
Yuzvendra Chahal Drunk and Stumbling While Walking Video Goes Viral Amid Divorced Rumours
Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलला नशेत चालताही येईना, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ‘तो’ Video व्हायरल, मद्यधुंद अवस्थेत…; नेमकं काय घडलेलं?

हेही वाचा…कोल्हापूरच्या मराठमोळ्या सरिताच्या प्रेमात पडलेला आर माधवन! सांगितलं २५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचं गुपित, म्हणाला…

रणबीर आणि राहा यांनी मॅचिंग निळ्या रंगाची जर्सी घातली होती, तर आलिया पांढरा टँक टॉप, काळा शर्ट आणि राखाडी पँटमध्ये खूपच स्टायलिश दिसत होती. आलियाने राहाच्या गालावर गोड किस केला, तर राहा प्रेक्षकांचा जल्लोष पाहून भारावलेली दिसत होती.

दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये राहा ‘मुंबई सिटी एफसी’च्या फुग्यांबरोबर खेळताना दिसते. याच व्हिडीओमध्ये रणबीरने राहाला मिठी मारली आणि तिला उचलून स्टेडियमच्या आजूबाजूला फेरफटका मारला. रणबीर २०१४ पासून ‘मुंबई सिटी एफसी’शी जोडला गेला आहे. तो बिमल पारेखबरोबर या टीमचा सहमालक आहे.

हेही वाचा…“त्या दिग्दर्शकाने मला ऑफिसमध्ये बोलावलं आणि…”, राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला ‘तो’ अनुभव

६ नोव्हेंबर २०२२ रोजी राहाचा जन्म झाला. अलीकडेच रणबीर आणि आलियाने राहाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. त्या निमित्ताने आलियाने आपल्या भावना व्यक्त करणारी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली.

हेही वाचा…जान्हवी कपूर मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिन्याला बॉयफ्रेंडबरोबर करायची ब्रेकअप; म्हणाली, “एकदा माझं…”

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या त्यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. या चित्रपटात विकी कौशलही मुख्य भूमिकेत आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट २० मार्च २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader