बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा ‘ये जवानी है दीवानी’ चित्रपट ३० मे २०१३ रोजी प्रदर्शित झाला होता. यंदा या चित्रपटाला १० वर्षं पूर्ण झाल्याने ‘धर्मा मूव्हीज’ने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून खास पोस्ट शेअर करीत या चित्रपटांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा : “टायगर श्रॉफचे नवे टॅलेंट…”; गाणं गाताना शेअर केला व्हिडीओ, निक जोनसच्या कमेंटने वेधले लक्ष

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

२०१३ मध्ये सुपरहिट ठरलेल्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाला दहा वर्षं पूर्ण झाल्याने, ‘धर्मा मूव्हीज’ने रणबीर कपूरने साकारलेल्या ‘बनी’ या पात्राच्या डायलॉगचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला हटके कॅप्शन देत लिहिलं आहे, “तुम्ही किती प्रयत्न करा मित्रांनो…विश्वास ठेवणं थोडं कठीण जाईल पण, या मैत्रीला १० वर्षं पूर्ण झाली आहेत.” अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलीन हे दोघेसुद्धा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. व्हिडीओबरोबर “जहाँ है वहीं का मजा लेते है…” या लोकप्रिय डायलॉगचे पोस्टसुद्धा ‘धर्मा मूव्हीज’ने शेअर केले आहे.

हेही वाचा : Fast X : हॉलीवूडच्या ‘फास्ट एक्स’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई; अवघ्या १२ दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

‘धर्मा मूव्हीज’ने शेअर केलेल्या या व्हिडीओवर ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाच्या चाहत्यांनी असंख्य कमेंट करीत “याचा दुसरा भाग लवकरात लवकर बनवा किंवा हाच चित्रपट पुन्हा रिलीज करा” अशी मागणी केली आहे. एका युजरने कमेंट करीत “माझ्या बालपणातील सर्वात आवडता चित्रपट” असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने युजरने “या चित्रपटाने मला मैत्री, प्रेम, आपल्या पालकांविषयीचे प्रेम सर्वकाही शिकवले,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘फायटर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तर अभिनेता रणबीरचा कपूरचा बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी रिलीज होणार असून याचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा करणार आहे.