Ranbir kapoor and katrina kaif celebrated navratri festival together rnv 99 | दुर्गा पूजेदरम्यान अचानक कतरिना आली समोर अन् तो..., 'त्या' कृतीमुळे रणबीर कपूर झाला ट्रोल | Loksatta

दुर्गा पूजेदरम्यान अचानक कतरिना आली समोर अन् तो…, ‘त्या’ कृतीमुळे रणबीर कपूर झाला ट्रोल

नुकतेच हे दोघे एका कार्यक्रमात समोरासमोर आले आणि त्यावेळी त्यांच्या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

दुर्गा पूजेदरम्यान अचानक कतरिना आली समोर अन् तो…, ‘त्या’ कृतीमुळे रणबीर कपूर झाला ट्रोल

बॉलीवूड कलाकारांच्या प्रेमाचा विषय निघाला की रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ही नावं नक्कीच घेतली जातात. दोघांनी ‘अजब प्रेम की गजब कहानी’ चित्रपटात एकत्र काम करताना रे एकमेकांच्या प्रेमात पडले. ते एकत्रही राहत होते परंतु त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि नंतर दोघे वेगळे झाले. आता दोघांनीही आपापला मार्ग स्वीकारला आहे. एकीकडे रणबीरने आलियाशी लग्न केले आहे, तर दुसरीकडे कतरिना तिचा जोडीदार विकी कौशलसोबत खूप खूश आहे. पण नुकतेच हे दोघे एका कार्यक्रमात समोरासमोर आले आणि त्यावेळी त्यांच्या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

आणखी वाचा : हिंदुस्तानी भाऊचे ‘गुडबाय’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन, ‘या’ कारणामुळे व्यक्त केला संताप

गेले काही दिवस नवरात्रीमुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण होते. अनेक सेलिब्रिटीही प्रसिद्ध ठिकाणच्या देवीचे दर्शन घेऊन हा सण साजरा केला. अशाच एका कार्यक्रमात रणबीर आणि कतरिनाने हजेरी लावली होती. यावेळचे रणबीर आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. यात दोघेही नवरात्रीचा सण एकत्र साजरा करताना दिसत आहेत.

बॉलिवूड सेलिब्रिटींनी सजलेली ही खास नवरात्री पूजा केरळमध्ये आयोजित करण्यात आली होती. यात कतरिना आणि रणबीर देखील सामील झाले. या सेलिब्रेशनच्या वेळचे दोघांचे अनेक फोटो समोर आले आहेत. ते फोटो पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यातील एका फोटोमध्ये रणबीर त्याच्या कतरिनाकडे टक लावून बघताना दिसत आहे. तर कतरिना रणबीरकडे लक्ष न देता इतर लोकांबरोबर नवरात्रीचा आनंद घेताना दिसत आहे.

हेही वाचा : कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टर यांचे धमाल रियुनियन, फोटो व्हायरल

रणबीर आणि कतरिनाचा तो फोटो पाहून नेटकरी समिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी रणबीरला कतरिनाला निरखून बघण्यामुळे ट्रोल केलं आहे, तर कोणी कतरिनाच्या वागण्यामुळे तिचे कौतुक केले आहे. रणबीर आणि कतरिनाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर कतरिना कैफने पीच रंगाचा ड्रेस घातला होता, तर दुसरीकडे रणबीर कपूरने काळ्या रंगाचा कुर्ता आणि काळ्या रंगाची सलवार परिधान केली होती. कतरिना कैफ आणि रणबीर कपूर सोबतच या कार्यक्रमात आर माधवन आणि नागार्जुन सारखे साऊथ स्टार्स देखील सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला अन् रणबीर कपूरने होणाऱ्या बाळासाठी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या

संबंधित बातम्या

बिपाशा बासूने शेअर केला लेकीचा पहिला फोटो; चाहते म्हणाले…
अखेर ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम; ‘हेरा फेरी ३’मध्ये अक्षय कुमार दिसणार की नाही याचा झाला खुलासा
उर्वशी रौतेलाच्या घरी लगीनघाई, अभिनेत्री रंगली हळदीच्या रंगात
१७ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध; तब्बल ३० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतणार प्रसिद्ध अभिनेत्री
Video : अभिनेत्री बनण्यापूर्वी अशी दिसायची प्रियांका चोप्रा, व्हिडीओ पाहून ओळखणंही झालं कठीण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“जगणंही कठीण झालं होतं कारण…” आमिर खानने सांगितला ‘तो’ प्रसंग, अभियक्षेत्रातील करिअरबाबतही केलं भाष्य
पुणे : विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनात गणेश देवी, डॉ. आ. ह. साळुंखे यांचा सहभाग
अजिंक्य रहाणेने पहिल्यांदाच शेअर केला लेकाचा फोटो, नाव ठेवलं…
समंथाचा ‘यशोदा’ लवकरच येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
“माझा फोन घेतला, पालकांना मारण्याची धमकी दिली अन् चेहऱ्यावर…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने केला घरगुती हिंसाचाराचा खुलासा