scorecardresearch

रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ची पहिल्या दिवशी दमदार कमाई, चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी

होळी आणि धुळवडीच्या सुट्ट्यांचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे.

ranbir shraddha

अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे. अखेर हा चित्रपट काल चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. गेले अनेक दिवस रणबीर आणि श्रद्धा त्यांच्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसले. आता त्यांच्या इतक्या दिवसांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटातून श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसत आहे. ट्रेलर पाहूनच त्यांच्यातली केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. तर या चित्रपटाने रिलीजपूर्वी ॲडव्हान्स बुकिंगधूनही चांगली कमाई केली आहे. तर त्या पाठोपाठ पहिल्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांना खुश करण्यात यशस्वी झाला आहे.

आणखी वाचा : रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ला मोठा फटका, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपट लीक

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.७३ कोटींचा गल्ला जमवला आहे. होळी आणि धुळवडीच्या सुट्ट्यांचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे. तर या आठवड्याच्या शेवटी हा आकडा आणखी वाढेल असाही अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा : “मी त्याला दम देऊन…” अनुपम खेर यांनी उधार घेतलेल्या पैशांबाबत सतीश कौशिकांनी केलेला खुलासा

‘तू झूठी में मक्कार’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून त्यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने टी दोघं पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. याबरोबरच या चित्रपटात डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 12:10 IST
ताज्या बातम्या