ओठात सिगारेट, विस्कटलेले केस; रणबीर कपूरचा डॅशिंग लूक, 'ॲनिमल'च्या सेटवरील व्हिडिओ लीक | ranbir kapoor dashing look in long hair leaked from the sets of upcoming movie animal | Loksatta

ओठात सिगारेट, विस्कटलेले केस; रणबीर कपूरचा डॅशिंग लूक, ‘ॲनिमल’च्या सेटवरील व्हिडिओ लीक

रणबीरच्या समोर आलीशान गाडी उभी आहे आणि गाडीच्या डीक्कीत हत्यारं ठेवली आहेत

ranbir kapoor animal video leaked
फोटो : सोशल मीडिया

‘अर्जुन रेड्डी’, ‘कबीर सिंग’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे संदीप वांगा रेड्डी यांच्या आगामी ‘ॲनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूर झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर झाली आहे. यातील रणबीरच्या जबरदस्त लूकचं चांगलंच कौतुक होत आहे. नुकतंच रणबीरने या भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे.

मध्यंतरी या चित्रपटाबाबत रणबीर कपूरने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारण्यासाठी तो खूप उत्सुक आहे आणि तो योग्य संधीची वाट पाहत होता असं त्याने सांगितलं. रणबीर म्हणाला होता “ॲनिमल चित्रपटातील भूमिका पाहून लोकांना धक्का बसेल. यात अनेक ग्रे शेड्स दिसणार आहेत. मी स्वतः याची आतुरतेने वाट पाहत आहे कारण चित्रपटाची कथा माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची आहे. मी खूप घाबरलो आहे पण चित्रपटासाठी तेवढाच उत्सुकही आहे.”

आणखी वाचा : नवाजुद्दीन सिद्दीकी दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज; या दिग्गज कलाकारांबरोबर करणार काम

आता रणबीरच्या या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ लिक झाला आहे. यामध्ये रणबीर महागड्या सुटाबुटात दिसत आहे, त्याच्या समोर आलीशान गाडी आहे आणि गाडीच्या डीक्कीत हत्यारं ठेवली आहेत. रणबीरचा यात एकदम डॅशिंग लूक आहे, त्याचे केस वाढले आहेत, ओठात त्याने सिगारेट धरली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, परिणीती चोप्रा, बॉबी देओल, सौरभ शूक्लासारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत. एका जुन्या मुलाखतीमध्ये संदीप वांगा रेड्डी यांनी हा चित्रपट खूप हिंस्त्र असणार आहे असा खुलासाही केला होता. ११ ऑगस्ट २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 20:25 IST
Next Story
Video : ‘पठाण’ चित्रपट सुरू असतानाच चाहत्यांनी थिएटरमध्येच फोडले फटाके अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल