रणबीर कपूरचा बहुचर्चित बहुप्रतिक्षित चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ आज (१ डिसेंबर) प्रदर्शित झाला. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे. या चित्रपटात रणबीर कपूरचे हिंस्त्र रुप बघायला मिळत आहे. रणबीरने साकारलेल्या भूमिकेचे सगळीकडे कौतुक होत आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का, रणबीरच्या या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, गोव्यात थाटात केलं लग्न; पाहा व्हिडीओ अन् फोटो

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे काही भागांचे शूटिंग बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसमध्ये करण्यात आले आहे. या शूटिंगचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सैफचे हे पतौडी पॅलेस हरियाणा राज्यातला गुडगाव जिल्ह्यातील पतौडी शहरात स्थित आहे. सैफला वारसामध्ये हा आलिशान राजवाडा मिळाला आहे. सैफच्या या राजवाड्यात १५० खोल्या असून याची किंमत जवळपास ८०० कोटी रुपये आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बनवला रेकॉर्ड

अ‍ॅनिमलच्या कमाईबाबत बोलायचं झालं तर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने एक नवा रेकॉर्ड तयार केला आहे. उत्तर अमेरिकेत या चित्रपटाने एक मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. या कमाईनंतर ‘अ‍ॅनिमल’ उत्तर अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट बनला आहे. भारतातही या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी ‘अ‍ॅनिमल’ भारतात ६० कोटी रुपये, तर जगभरात १०० कोटींपेक्षा अधिक कमाई करण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा- ‘सॅम बहादूर’ च्या निर्मात्यांना मोठा झटका; प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपट ऑनलाईन लीक, कमाईवर परिणाम होणार?

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात रणबीर कपूरसह साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनिल कपूर या चित्रपटात रणबीरच्या वडिलांची, तर रश्मिकाने रणबीरच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. संदीप रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor film animal shooting in saif ali khans pataudi palace photo viral dpj
First published on: 01-12-2023 at 19:16 IST