Ranbir Kapoor Highest Opening day Box Office Collection movies list: एखादा नवीन सिनेमा प्रदर्शित होण्याआधी तो सिनेमा किती कमाई करणार, तो ब्लॉकबस्टर ठरणार का, तसेच आधीच्या सिनेमांचे रेकॉर्ड मोडणार का, पहिल्या दिवशी किती कमाई करणार, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असतात. रामायण सिनेमाचे बजेट २००० कोटी इतके असल्याचे म्हणले जात आहे. बिग बजेट असलेल्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड करणार का, हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
आता आपण रणबीर कपूरच्या अशा दहा सिनेमांबद्दल जाणून घेऊया, ज्या सिनेमांनी पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे.
अॅनिमल
रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला अॅनिमल हा सिनेमा १ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित झाला होता. संदीप रेड्डी वांगा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. रणबीरबरोबरच रश्मिका मंदाना, अनिल कपूर, तृप्ती डिमरी, बॉबी देओल हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसले होते. सॅल्कनिकनुसार, या सिनेमाने पहिल्या दिवशी ६३.८ कोटींची कमाई केली होती.
ब्रह्मास्त्र: पार्ट वन- शिवा
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ब्रह्मास्त्र: पार्ट वन- शिवा हा सिनेमा आहे. अयान मुखर्जी यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. ९ सप्टेंबर २०२२ला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यामध्ये रणबीर कपूरबरोबरच आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन हे लोकप्रिय कलाकार दिसले होते. सिनेमाने पहिल्या दिवशी ३७ कोटींची कमाई केली होती.
‘संजू’
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ हा चित्रपट २९ जून २०१८ ला प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित बायोपिक होता. या चित्रपटात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली होती. सिनेमाने पहिल्या दिवशी ३४.७४ कोटींची कमाई केली आहे.
‘बेशरम’
अभिनव कश्यप दिग्दर्शित ‘बेशरम’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०१३ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पल्लवी शारदाने रणबीर कपूरबरोबर काम केले होते. विशेष म्हणजे, रणबीरचे खरे आई-वडील, ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी यात त्याच्या आई-वडिलांची भूमिका साकारली होती. सॅल्कनिकनुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी २१. ५६ कोटींची कमाई केली होती.
‘ये जवानी है दीवानी’
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ये जवानी है दीवानी’ हा चित्रपट ३१ मे २०१३ रोजी प्रदर्शित झाला होता. यामध्ये रणबीर कपूरबरोबर दीपिका पादुकोण, आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलिन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सॅल्कनिकनुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी २१.४५ कोटी कमावले होते.
‘तू झूठी मैं मक्कार’
लव रंजन दिग्दर्शित ‘तू झूठी मैं मक्कार’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ८ मार्च २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा रोहन अरोरा आणि निशा मल्होत्रा यांच्याभोवती फिरते. सिनेमाने पहिल्याच दिवशी १५.७३ कोटींची कमाई केली.
‘ए दिल है मुश्किल’
करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट २८ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सिनेमाने पहिल्या दिवशी १३.३० कोटींचा गल्ला जमवला होता.
‘रॉकस्टार’
इम्तियाज अली दिग्दर्शित ‘रॉकस्टार’ हा चित्रपट ११ नोव्हेंबर २०११ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत नर्गिस फाखरी, अदिती राव हैदरी आणि कुमुद मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाने पहिल्याच दिवशी अंदाजे ११ कोटी रुपयांची कमाई केली होती.
‘तमाशा’
इम्तियाज अली दिग्दर्शित ‘तमाशा’ हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. सिनेमाने पहिल्या दिवशी १०.८७ कोटी कमावले होते.
रामायण
रणबीर कपूर व साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असलेला रामायण हा सिनेमा आज ( ५ नोव्हेंबर २०२६)ला प्रदर्शित झाला आहे. सॅल्कनिकनुसार, सकाळी ११ वाजेपर्यंत चित्रपटाने १२.६९ कोटींची कमाई केली आहे. आता सिनेमा संपूर्ण दिवसभरात किती कमाई करणार हे, पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
