बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याचा ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. काही दिवासांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये रणबीरचा रुद्रावतार दाखवण्यात आला आहे. रणबीरच्या या लूकला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. दरम्यान या चित्रपटासाठी रणबीर कपूरने नेमकं मकिती मानधन घेतलं याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. रणबीरने या चित्रपटासाठी आपल्या फीमध्ये घट केली असल्याचे सांगण्यात येत आहे.




मीडिया रीपोर्टनुसार रणबीरने ‘अॅनिमल’ चित्रपटासाठी तब्बल ७० कोटी मानधन घेतली असल्याची बातमी समोर आली होती. मात्र, ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या प्रोडक्शनला उशीर झाला असल्यामुळे रणबीरने आपली फी ५० टक्के घटवली असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटासाठी रणबीरने ३०-३५ कोटी घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे रणबीरने चित्रपट निर्माता संदीप रेड्डी वांगा आणि भूषण कुमार यांच्याबरोबर प्रॉफिट शेयरिंग डील केली आहे.
बॉबी देओलला या चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी मिळाले असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच अनिल कपूर यांना या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत घेतल्याने त्यांना फक्त २ कोटीच देण्यात आले आहेत. तर रश्मिका मंदानालाही तिच्या भूमिकेच्या मानाने कमी मानधन मिळालं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा- अमिताभ बच्चन यांचा ८१ वा वाढदिवस खास पद्धतीने होणार साजरा; बिग बींच्या ‘या’ आवडत्या वस्तूंचा होणार लिलाव
१ डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीरबरोबर बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.